बंगळुरु चेंगराचेंगरी प्रकरणात पोलीस आयुक्तांसह 8 अधिकारी निलंबित, निवृत्त न्यायाधीश करणार चौकशी

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितलं की, या प्रकरणाची चौकशी हायकोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती मायकल डी कुन्हा यांच्या एक सदस्यीय आयोगामार्फत करण्यात येणार आहे.

बंगळुरु – बंगळुरु चेंगराचेंगरी प्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि डीएनए इव्हेन्ट मॅनेजमेंटच्या अधिकाऱ्यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबत बंगळुरुचे पोलीस आयुक्त आणि 8 अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेशही देण्यात आलेत. निलंबित करण्यात आालेल्या पोलीस अधिकाऱ्यांत पोलीस आय़ुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त, कब्बन पार्क ठाण्याचे प्रभारी, एसीपी, डीसीपी, क्रिकेट स्टेडियम प्रभारी या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितलं की, या प्रकरणाची चौकशी हायकोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती मायकल डी कुन्हा यांच्या एक सदस्यीय आयोगामार्फत करण्यात येणार आहे.

हायकोर्टानं सरकारकडे स्टेटस रिपोर्ट मागितला

बंगळुरुत झालेल्या घटनेची दखल कर्नाटक हायकोर्टानं घेतल्यानंतर या प्रकरणात सुनावणी झाली. या प्रकरणाची सद्यस्थितीची माहिती सरकारच्या वतीनं कोर्टात देण्यात आली. या प्रकरणात सीआयडी चौकशी करण्यात येत असून एसआयटीही नेमण्यात आल्याची माहिती सरकारच्या वतीनं देण्यात आली. या प्रकरणी आरसीबी आणि डीएनए इव्हेन्ट एजन्सीच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आल्याचंही कोर्टात सरकारच्या वतीनं सांगण्यात आलंय.

या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये चेंगराचेंगरीची घटना ही जबाबदार असलेल्या यंत्रणांच्या बेपर्वाईनं झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी सरकारनं स्टेटस रिपोर्ट दिल्यानंतर, आता 10 जूनला याची पुढील सुनावणी होणार आहे.

खेळाडूंना सन्मानित करण्याचा निर्णय कुणाचा?

याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी कोर्टात प्रश्न उपस्थित केला आहे की, आरसीबीच्या क्रिकेटर्सचा सन्मान करण्याचा निर्णय कुणी घेतला. याबाबत राज्य सरकारनं कोर्टात माहिती देण्याची विनंती करण्यात आलीय.

विजयानंतर सरकारनं विधानभवन परिसरात या क्रिकेटर्सचा सन्मा करण्याचं नियोजन केलं होतं. त्यानंतर चिन्नास्वामी स्टेडियममध्ये हा कार्यक्रम करण्याचं ठरवण्यात आलं. या कार्यक्रमापूर्वी स्टेडियमच्या प्रवेशद्वाराजवळ चेंगराचेंगरी झाली यात 11 जणांचा मृत्यू झाला, तर 33 जणं जखमी झाले आहेत.


About Author

Smita Gangurde

Other Latest News