580 शिक्षकांची बोगस भरती प्रकरणाचा ‘मास्टर माईंड’ निलेश मेश्रामच, कोट्यावधीची माया जमवली

निलेश मेश्राम याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये तो समोरच्या व्यक्तिला बनावट कागपत्र तयार करण्यासंदर्भात बोलत आहे. तसेच पैशाची मागमी करत आहेत.

नागपूर : खासगी प्राथमिक शाळांमध्ये तब्बल 580 शिक्षकांची भरती बनावट कागदपत्रांच्या आधारे केल्याचे नागपूर जिल्ह्यात समोर आले आहे. पराग पुंडके या मुख्याध्यापकला बनावट कागपत्रे सादर केल्याप्रकरणी अटक केले आहे. तर, तर नागपूरचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरडे हे देखील या प्रकरणी अटकेत आहेत. पोलिसांनी त्याचासह

या बनावट कागदपत्रांमागील मास्टर माईंड निलेश मेश्राम असल्याचे समोर आले आहे. निलेश हा माध्यमिक शिक्षक कार्यालयात कामाला होता. तोच या प्रकरणी मुख्य आरोपी आहे. पोलिसांनी त्याच्यासह शिक्षण उपसंचालक कार्यालायती उपनिरीक्षक दुधाळकर आणि एका वरिष्ठाला देखील अटक केली आहे.

निलेश मेश्रामकडे 50 कोटीची संपत्ती

निलेश मेश्राम हा शिक्षण उपसंचालक कार्यालयात असतना बनावट कागपत्र तयार करण्यातून त्याने कोट्यावधीची संपत्ती जमा केल्याची माहिती आहे. मीडिया रिपोर्टनुसार निलेशकडे तब्बल 50 कोटीची संपत्ती आहे. बनावट कागपत्राद्वारे मुख्याध्यपक झालेल्या पुडके याच्याकडून त्याने 10 लाख रुपये घेतल्याची माहिती आहे.

शिक्षणसम्राट होण्याकडे वाटचाल…

निलेश हा शिक्षण उपसंचालक कार्यालयात कार्यरत असताना त्याने स्वतःच्या शाळा देखील चालू केल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार पाच शाळा त्याच्या आहेत. त्यातील चार नागपूरमध्ये तर एक खामगाव तालुक्यात आहे. एका शाळेला अल्पसंख्यांकचा दर्जा मिळवून त्याने फायदाल लाटल्याचेही समोर आले आह.

ऑडिओ क्लिप व्हायरल

निलेश मेश्राम याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये तो समोरच्या व्यक्तिला बनावट कागपत्र तयार करण्यासंदर्भात बोलत आहे. तसेच पैशाची मागमी करत आहेत. दरम्यान ‘एमपी मराठी’ या ऑडिओक्लिप अधिकृत असल्याची पुष्टी करत नाही.


About Author

Arundhati Gadale

Other Latest News