लाडकी बहिण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याचं काय झालं? मे आणि जूनचे पैसे एकत्रित मिळण्याची शक्यता

जून महिना सुरू झाला तरी लाडकी बहिण योजनेचे मे महिन्याचे पैसे अद्याप महिलांना मिळालेले नाहीत...अशा परिस्थितीत मे आणि जूनचे पैसे एकत्रित मिळणार का, असा सवाल विचारला जात आहे.

राज्यातील लाडक्या बहिणींची मे महिन्याच्या पैशांबाबत चांगलीच निराशा झाली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. मात्र, मे महिना संपला तरी लाडक्या बहिणींना मे महिन्याचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. शिवाय आता जून महिना सुरू झाला आहे, अशा परिस्थितीत मे महिन्याचे पैसे नेमके कधी येणार? असा सवाल राज्यातील लाडक्या बहिणी विचारू लागल्या आहेत. त्यामध्ये आता मे आणि जूनचे एकत्रित 3 हजार रूपये  मिळण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

मे महिन्याचे पैसे कधी मिळणार?

लाडकी बहीण योजना खूपच लोकप्रिय झाली. याच योजनेमुळे महायुतीला विधानसभा निवडणुकीत महाविजय मिळाल्याचं बोललं जातं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. पण आता मे महिना संपला तरी अद्याप मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे मिळाले नाहीत त्यामुळे या महिन्याच्या हपत्याकडे सर्व महिलांच्या नजरा लागल्या आहेत.

एप्रिल महिन्याचे पैसे मे महिन्याच्या सुरूवातीला लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले आहेत.  साधारणत: प्रत्येक महिन्याच्या 15 ते 20 तारखेनंतर योजनेचे पैसे महिलांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येतात. एप्रिल महिन्याचा लाभ मे महिन्याच्या सुरुवातीला मिळाल्याने मे महिन्याच्या अखेरीस चालू महिन्याचा लाभ मिळेल अशी अपेक्षा सर्व लाडक्या बहिणींना होती. पण आता मे महिना उलटला तरी हप्त्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा न झाल्याने संभ्रमाचे वातावरण आहे.

वटपौर्णिमेचा मुहूर्त साधणार?

जून महिन्यात वटपौर्णिमेचा सण आहे. याच वटपौर्णिमेचे मुहूर्त साधून सरकार मे आणि जून महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करु शकतात असे बोलले जात आहे. त्यामुळे या योजनेचे पैसे येत्या 10 जूनला महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.

मे आणि जूनचे पैसे एकत्रित मिळणार?

मे महिन्याचे पैसे जून महिन्यात दिले जाण्याची शक्यता आहे. मे आणि जून अशा दोन महिन्यांचे मिळून एकत्रित 3000 रुपये दिले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, याबाबत अद्यप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये राज्य सरकारकडून देण्यात येत असतात. पात्र महिलांच्या बाँक खात्यात थेट डीबीटी मार्फत पैसे जमा होत असतात. आतापर्यंत एकूण 10 हप्ते लाडक्या बहिणींना देण्यात आले आहेत. आता मे महिन्याचा म्हणजेच 11वा हप्ता तर जून महिन्याचा 12वा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News