मुंबईतील विले पार्ले भागात जैन समाज रस्त्यावर, जुने मंदिर पाडल्याने पालिका प्रशासनाच्या विरोधात आंदोलन…

मंदिर तोडण्यासाठी पालिका प्रशासनाने नोटीस बजावली होती. या विरोधात जैन समाज न्यायालयात गेला होता. मात्र न्यायालयाने जैन समाजाची याचिका फेटाळली होती. त्यानंतर जैन समाजाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

मुंबई – मुंबईतून एक आंदोलनाची बातमी समोर येत आहे. मुंबईतील विलेपार्ले भागात जैन समाज मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहे. या भागात अनेक वर्षांपासूनचे जुने असलेले पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर हे मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी पाडले आहे. मंदिर पाडल्याच्या विरोधात जैन समाज रस्त्यावर उतरुन पालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत संतप्त आंदोलन केले.

घोषणाबाजीने परिसर दुमदुमला…

दरम्यान, पालिका प्रशासनाने जुने असलेल्या पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर तोडले. या विरोधात जैन समाजने मोर्चा काढत मोठ्या संख्येने आंदोलन केले. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात जैन बांधव सहभागी झाले होते. तसेच हातात मोठे-मोठे फलक घेऊन पालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली.  ‘मंदिर तुटा, हौसला नाही,’ अशा घोषणाबाजी आंदोलनकर्त्यांनी केली. मंदिर पाडले आहे, त्यात ठिकाणी पुन्हा मंदिर बांधून द्यावे, अशी मागणी जैन बांधवांनी केली आहे. पण विलेपार्ले परिसर घोषणाबाजीने दुमदुमून गेला.

मंदिर पुन्हा बांधून देण्याची मागणी…

शनिवारी सकाळी जैन समाजाकडून आंदोलनाला सुरुवात झाली होती. आंदोलनापूर्वी जैन बांधवांनी तोडलेल्या मंदिराच्या ठिकाणी आरती करून आंदोलनास सुरुवात केली. आणि ज्या ठिकाणी मंदिर तोडले आहे, त्याच ठिकाणी पालिका प्रशासनाने पुन्हा मंदिर बांधून द्यावे, अशी मागणी जैन समाजाने केली आहे. विशेष म्हणजे आंदोलनात भाजपाचे नेते आणि आमदार पराग आळवणी ही सहभागी झाले होते. तर मंत्री मंगलप्रभात लोढा, काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी सुद्धा आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

प्रकरण न्यायालयीन प्रलंबित असताना…

दुसरीकडे मुंबईतील विलेपार्ले भागात नेमिनाथ को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी जवळच हे जुने जैन समाजाचे मंदिर होते. मंदिर तोडण्यासाठी पालिका प्रशासनाने नोटीस बजावली होती. या विरोधात जैन समाज न्यायालयात गेला होता. मात्र न्यायालयाने जैन समाजाची याचिका फेटाळली होती. त्यानंतर जैन समाजाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयात हे प्रकरण प्रलंबित असताना आणि न्यायालयाने कोणता निर्णय दिला नसताना, पालिका प्रशासनाने निर्णयाची वाट न पाहता मंदिर पाडले, असा आरोप जैन समाजाकडून करण्यात येत आहे. त्यामुळं आता पालिका प्रशासन कोणती भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News