Sanjay Shirsath – छत्रपती संभाजीनगर येथील धनदा कार्पोरेशन लिमिटेड व हॉटेल VITS या हॉटेलवरून मंत्री संजय शिरसाट आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. हॉटेलच्या लिलावात मोठा घोटाळा झाला आहे. असा गंभीर आरोप अंबादास दानवेंनी केला आहे. सत्तेचा गैरवापर करून संजय शिरसाट यांनी हे हॉटेल अत्यंत कमी किंमतीत खरेदी केल्याचा दानवेंचा आरोप आहे. मात्र या सर्व आरोपांचे मंत्री संजय शिरसाट यांनी खंडन करत, दानवेंना जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे.
दम असेल तर हॉटेल घ्या…
दरम्यान, मी सांगतो की माझ्या मुलाला त्याच्या पार्टनरला की, या हॉटेल खरेदीतून तुम्ही तुमच्या निविदा मागे घ्या…, माघार घ्या आणि जर तुमच्यात दम असेल तर हे हॉटेल तुम्ही खरेदी करा. तुमचे मी स्वागत करतो. असं आव्हानं मंत्री शिरसाटांनी दानवेंना दिलं आहे. मात्र आम्ही आमच्या दोन-चार एकर जमिनीवर समाधानी आहोत. आणि हा हॉटेल काय आमचा व्यवसाय नाही आहे. शिरसाटांचा तो धंदा असेल पण आमचा नाही, असा पलटवार दानवेंनी केला आहे.

काचेच्या घरात राहणाऱ्यांनी…
दुसरीकडे तुमची लायकी नाही म्हणून तुम्हांला बँक लोन देत नाही. यासाठी इज्जत कमवावी लागते. पण तुमची लायकी नसल्यामुळं तुम्हाला कोणती बँक लोन देत नाही, असं बोचरी टिका शिरसाटांनी केली. तुमच्या मुलांचे कसे मुलींसोबत संबंध होते. प्रकरण कसे मिटवले, त्यासाठी कोण आले होते. पण त्यात एक मुलगी होती, म्हणून मी वैयक्तिक कोणावर बोलत नाही. पण काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारण्याचा प्रयत्न करु नये, अशा इशारा अंबादास दानवेंनी शिरसाटांना दिला आहे.