Mumbi Rain – मुंबईत मे महिन्यात अंतिम आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहेत. या महिन्यात सरासरीपेक्षा ४२ टक्के जास्त पाऊस झाला. मे महिन्यातच विक्रमी १५९.४ मिलिमीटर पावसाची नोंद केली. मात्र यानंतर पावसाचा जोर कमी झाला होता. अधूनमधून पाऊस बरसत आहे. मात्र आज राज्यातील विविध भागात मुसळधार पावसाचा अंदाज असून, मुंबईसह उपगनगरात रविवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे.
रेल्वे लोकलवर परिणाम…
दरम्यान, रविवारी रात्रीपासून मुंबई आणि उपनगरात मुसळधार पाऊस पडत आहे. यामध्ये मुंबईत दादर, परेल, लालबाग, दक्षिण मुंबई, माहिम, बांद्रा, शिवडी, सायन, कुर्ला आदी भागात जोरदार पाऊस पडत आहे. तर दुसरीकडे मुसळधार पावसाचा फटका आणि परिणाम रेल्वे लोकलवरही जाणवत आहे. मध्य रेल्वेच्या १५ मिनिट उशिरा गाड्या आहेत. तर हार्बर मार्गावर १५ मिनिट उशिरा गाड्या आहेत.

मुंबईत सखल पाणी भागात पाणी साचले…
राज्यातील काही जिल्ह्यामध्ये हवामान खात्याने आज अलर्ट दिला आहे. पण मुंबईसह उपनगरात पाऊस जोरदार पडत आहे. बोरिवली, वसई-विरार, नालासोपारा, दिवा, कल्याण, डोबिंवली, अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर आदी भागात जोरदार पाऊस पडत आहे. मुंबईतील मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. तर मुंबईत वादळी वारा आणि पावसामुळं मुंबईतल राजकीय पक्षानी जे बॅनर लावले होते. ते कोसळले आहेत.