राज्यात पावसाचा जोर कायम राहणार; रायगड आणि रत्नागिरीला रेड अलर्ट!

महाराष्ट्रात पावसाचा जोर असाच कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सविस्तर जाणून घेऊ...

राज्यात सातत्याने पावसाची संततधार सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आज 23 मे रोजी देखील राज्यात पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच कोकणातील काही जिल्ह्याना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. नेमका हवामान विभागाचा अंदाज काय? त्याबाबत सविस्तर जाणून घेऊ…

रायगड, रत्नागिरीला रेड अलर्ट 

राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा जोर वाढला आहे. गेले काही दिवस राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला होता. आता 23 मेसाठी रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबईत दिवसभर ढगाळ वातावरण राहील. तसेच जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबईत 23 मे रोजी किमान तापमान 22 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. पुण्यातही ढगाळ वातावरणाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुण्यातील तापमान साधारणपणे 21 ते 33 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील.

राज्यभरात पाऊस बरसणार?

धुळे, जळगाव, कोल्हापूर, सातारा, नंदुरबार, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, जालना, धाराशिव, भंडारा, अकोला, अमरावती, गडचिरोली, बुलढाणा, चंद्रपूर, वर्धा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांना 23 मे साठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे

पावसाने शेतीचे नुकसान 

राज्यातील शेती क्षेत्राला या सातत्याने सुरू असणाऱ्या पावसामुळे मोठा फटका बसला आहे. हजारो हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. पंचनामे करून तत्काळ नुकसान भरपाई द्या, अशी मागणी शेतकरीवर्ग करत आहे.

आपत्ती निवारण विभागाचे संपर्क क्रमांक

पावसाळ्यात विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती निर्माण होत असतात. या आपत्ती निवारणासाठी संपर्क करता यावा यासाठी राज्य आपत्ती निवारण संपर्क क्रमांक दिले आहेत. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग मान्सून पूर्व तयारीची बैठक संपन्न झाली. या बैठकीनंतर हे संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आले.

संचालक – आपत्ती व्यवस्थापन केंद्र – 9819207435, उप सचिव (एमसीआर) – 8169006195, राज्य आपत्ती व्यवस्थापन केंद्र – 9422560196, लॅन्डलाईन नंबर – 022-220227990, 22794229, 2203 ध्यान (2203023), ९३२१५८७१४३, सॅटेलाईट फोन नंबर – 8991119253 या प्रमाणे आहेत.

आपत्तीच्या काळात वरील संपर्क क्रमांक वापरून मदत मिळवता येईल.

 


About Author

Rohit Shinde

Other Latest News