मुंबई : या नव्या अद्ययावत आपत्कालीन कार्य केंद्रामुळे अचूक आणि आपत्तीच्या वेळी जलद होणार असून, राज्य आपत्कालीन कार्य केंद्रात आधुनिक वेगवान संवादव्यवस्था, तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) वापरामुळे आपत्ती व्यवस्थापनाला तंत्रज्ञानाला बळ मिळाले आहे. असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मंत्रालयात राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन आदी उपस्थितीत होते.
कम्युनिकेशन सिस्टीमसाठी सशक्त कमांड…
दरम्यान, हवामानातील बदलामुळे आपत्तीचे स्वरूप, तीव्रता आणि वारंवारता बदलत आहे. दरम्यान, आपत्ती व्यवस्थापनासाठी एक सशक्त कमांड आणि कम्युनिकेशन सिस्टीमसाठी उपयोगी ठरेल. तसेच जलद प्रतिसाद देता यावा आणि निर्णय लवकर घेता यावेत, यासाठी हे केंद्र कामी येईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. दुसरीकडे राज्यातील अनेक जिल्ह्यातही अशा प्रकारची आधुनिक व्यवस्था उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आणि ते काम लवकरच पूर्ण होईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

आपत्ती व्यवस्थापनामुळे राज्याला बळकटी…
हे आपत्ती व्यवस्थापन अत्यंत आधुनिक आणि सुसज्ज व्यवस्था उभी केली आहे. अशा आपत्ती व्यवस्थापनाच्या बळकटीकरणात महाराष्ट्र अग्रेसर आहे. आपत्ती येऊ नये हीच सर्वाची इच्छा असते. पण आपत्ती आलीच तर तिच्याशी सक्षमपणे लढण्यासाठी… तिला सामोरी जाण्यासाठी अनेक राज्याकडे काही तयारी नसते. आपत्ती आल्यानंतर तिच्या उपायासाठी धावपळ होते. मात्र आपली व्यवस्था पूर्णपणे सज्ज आहे. दरम्यान, आपत्कालीन केंद्राच्या उभारणीत ज्यांनी योगदान दिले आहे. त्या सर्व अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले. तसेच या व्यवस्थापनामुळे राज्याला बळकटी मिळेल, आणि महाराष्ट्र राज्य अधिक सक्षम झाले आहे, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.