राणीच्या बागेतील तीन पेग्विंनच्या पिल्लांना दिलेल्या नावावरुन राजकीय गोंधळ, काय आहे प्रकरण?

महाराष्ट्रात हिंदी भाषेवरुन राजकारण करणे ही काही नवीन गोष्ट नाही. मराठी न बोलल्याने लोकांना मारहाण केल्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. पण पेंग्विनला मराठी नाव न दिल्याने राजकीय नेते नाराज झाले आहेत.

मुंबईतील भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणी संग्रहालय म्हणजेच राणीबागेत जन्मलेल्या पेग्विंनच्या तीन पिल्लांची नावं इंग्रजीत ठेवल्यावरुन वाद निर्माण झाला आहे. मुंबईतील पालिका निवडणुका तोंडावर असताना हा वाद पुढे आला आहे. याशिवाय गेल्या काही काळात राजकीय पक्ष भाषेच्या मुद्द्याला अधिक महत्त्व देत असल्याने मराठीवरुन पुन्हा नवा वादंग निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. भाजप नेत्यांनी सांगितलं की, महाराष्ट्रात जन्मलेल्या या पेंग्विनची नावं मराठीत असायला हवीत. ज्यातून महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख वाढेल आणि मराठी भाषेचा सन्मान राखला जाईल.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

मार्च २०२५ मध्ये राणीच्या बागेतील आठ पेंग्विनमधील तीन पिल्लांना जन्म दिला. प्राणी संग्रहालय प्रशासनाने यांची नावं नॉडी, टॉम आणि पिंगू ठेवलं. मात्र भाजप नेत्यांना ही नावं रुचली नाहीत. भायखळा विधानसभा मतदारसंघातील भाजप नेता निलेश बाकर यांनी यावर आक्षेप नोंदवला. आणि राणीबागेच्या प्रशासनाला पत्र लिहिलं. त्या पत्रामध्ये दिल्यानुसार, मराठीला अलिकडेच अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे मराठी नावांना प्राधान्य द्यायला हवे होते. या पेंग्विनना इंग्रजी नावं ठेवणं हा मराठी भाषेवरील अन्याय आहे. हा मराठी भाषेवरील द्वेष नाही का?”

भाजपाचा विरोध…

या पत्रात प्रशासनाला इशाराही देण्यात आला आहे. जर त्यांनी पिल्लांचं मराठी नामकरण केलं नाही तर भाजप आंदोलन पुकारेल. या अर्जाची पत्र मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री आणि पालिका अधिकाऱ्यांना पाठविण्यात आली आहे. अद्याप तरी राणीबागेच्या अधिकाऱ्यांकडून या पत्रावर कोणतंही उत्तर आलेलं नाही. भाजपचं म्हणणं आहे की, पेंग्विनचा जन्म मुंबईत झाला आहे. ते दुसरीकडून आलेले नाहीत. अशात ते इथले भूमिपूत्र आहेत. त्यामुळे त्यांची नावं मराठीतच असायला हवी. मुंबईत भाषा आणि सांस्कृतिक ओळखीवरून राजकारण बऱ्याच काळापासून सुरू आहे. पूर्वी हे मुद्दे फक्त लोक आणि नोकऱ्यांपुरते मर्यादित होते, आता ते प्राण्यांपर्यंत पोहोचले आहेत.

 

 

 

 

 

 

 

 


About Author

Smita Gangurde

Other Latest News