मुंबई – विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सध्या सोशल मीडियाचे युग आहे. या सोशल मीडियाच्या काळात सर्व आपणजण ऑनलाइन कामाला पसंती देतो. पूर्वीच्या ऑफलाईन कामाला छेद देत आता जास्तीत जास्त ऑनलाईन आणि डिजिटल कार्यप्रणालीकडे वळले आहेत. मात्र हे ऑनलाईन काम करताना किंवा आर्थिक व्यवहार करताना बऱ्याच लोकांची फसवणूक होण्याची ही शक्यता नाकारता येत नाही. सायबर गुन्हेगार फेक अकाउंट बनवून लोकांना गंडा घालण्याच्या कित्येक घटना घडल्या आहेत. दरम्यान, आता मुंबई विद्यापीठाच्या नावाने बनावट फेसबूक पेज तयार करण्यात आले आहे. म्हणून मुंबई विद्यापीठाच्या बाबतीतही विद्यार्थ्यांची फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांनी सतर्क राहवे आणि खबरदारी घ्यावी असं मुंबई विद्यापीठाने म्हटले आहे.
प्रवेशाच्या नावाखाली फसवणूक…
दरम्यान, आता शाळा कॉलेजच्या परीक्षा संपत आल्या आहेत. उन्हाळी सुट्टी लागेल. जून महिन्यात शाळा कॉलेजच्या प्रवेशाला आणि मुंबई विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाला सुरवात होईल. दरम्यान, मुंबई विद्यापीठाच्या नावाने बनावट फेसबुक पेज बनवण्यात आले असून, त्या फेसबुक पेजवर विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आवाहन करण्यात आले आहे. हॅकर्सच्या या अमिषाला विद्यार्थ्यांची फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सतर्क रहावे… खबरदारी घ्यावी आणि असल्या कुठल्याही फेसबुक पेजला प्रतिसाद देऊ नये, असं आवाहन मुंबई विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना आणि पालकांना करण्यात आले आहे.

पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर…
सध्या सायबर गुन्हेगारी वाढत आहे. फेक अकाउंट बनवून लोकांची फसवणूक करणे किंवा आपण बँकेतून बोलतोय असं सांगून लोकांकडून ओटीपी आणि पासवर्ड घेऊन त्यांचं अकाउंट फस्त केले जाते. आणि लाखो-करोडोचा गंडा घातला जातो. हे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे सायबर गुन्हेगारीला रोखण्याचं मोठं आव्हान सायबर क्राईम विभागासमोर आहे. आता मुंबई विद्यापीठाच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट बनवल्यामुळे मुंबईतील पोलीस यंत्रणा अलर्ट झाली असून, सायबर क्राईम विभागाने हे बनावट फेसबुक अंकाऊट कोणी बनवले आहे, याचा शोध घेत आहेत. कारण मुंबई विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमासाठी लाखो विद्यार्थी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी फी भरतात… आर्थिक व्यवहार करतात. त्यामुळे खरोखरच विद्यार्थ्यांचे या खोट्या फेसबुक अंकाऊटवरुन फसवणूक होऊ नये, आणि त्याला ते बळी पडू नये. यासाठी सायबर क्राईम विभाग सतर्क झाला आहे. दरम्यान, बनावट फेसबुक पेज https://www.facebook.com/share/1ALkntvz9o/ या लिंकवर आढळून आले असून, त्याला विद्यार्थ्यांनी प्रतिसाद देऊ नये असं सायबर क्राईम विभागाने म्हटले आहे.