11 वी ऑनलाईन प्रवेश प्रकिया दुपारी 2 वाजेपर्यंत अर्ज करता येणार, शालेय गुणवत्तेचा आराखडा अधिकाऱ्यांनी प्रभावीपणे राबवावा – दादाजी भुसे

शैक्षणिक व्यवस्थेतील अडचणी सोडवण्यासाठी शिक्षण विभाग सकारात्मकरित्या काम करीत असून शिक्षकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्यात येणार आहे. शासकीय शाळांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणपद्धती रुजविण्यावर भर दिला आहे. शाळांमध्ये डिजिटल साधनांची उपलब्धता वाढवण्यात येत आहे. 

Dadaji Bhuse : 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रकियेला 5 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामुळं आज 5 जून रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत 11 वी ऑनलाईन प्रवेश अर्ज दाखल करता येणार आहे. ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया विद्यार्थी नोंदणीसाठी 26 मे 2025 ते 3 जून 2025 हा कालावधी देण्यात आला होता. मात्र याची मुदतवाढ 5 जूनपर्यंत देण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीसाठी आज रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती प्र. शिक्षण संचालक (माध्यमिक) डॉ. श्रीराम पानझाडे यांनी दिली होती.

चांगले आणि दर्जेदार शिक्षण मिळावे…

दरम्यान, राज्यातील प्रत्येक मुलाला चांगले आणि दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शिक्षण विभाग कटिबद्ध असून शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी राज्यभरातील शाळांमध्ये पायाभूत व भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले जात आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचे हेल्थ कार्ड तयार करण्यात येणार असून त्याअंतर्गत नियमित आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनासाठी वार्षिक कृती आराखडा विकसित केला असून येत्या शैक्षणिक वर्षात अधिकाऱ्यांनी त्याची प्रभावी अंमजबजावणी करावी, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले.

प्रत्येक  विद्यार्थ्याने आईच्या नावे एक झाड लावावे…

दुसरीकडे शैक्षणिक वर्षात शाळेतील पहिल्या दिवसापासून प्रत्येक विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे मंत्री भुसे यांनी यावेळी सांगितले. तसेच येत्या शैक्षणिक वर्षात प्रत्येक  विद्यार्थ्याने आईच्या नावे एक झाड लावून त्याचे संगोपन करावे, असेही शालेय शिक्षण मंत्री भुसे यांनी सांगितले. विशेष म्हणजे शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी त्यांच्या मतदारसंघातील जवळच्या शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत. असे भुसे यांनी  सांगितले.


About Author

Astha Sutar

Other Latest News