सोलापूर : सोलापुरातील प्रसिद्ध मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी मनीषा मुसळे-माने या महिलेला अटक करण्यात आलीय. ही महिला वळसंगकर यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत होती. डॉ. वळसंगकर यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये या महिलेचा उल्लेख होता. या महिलेनं आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर या महिलेला शनिवारी अटक केल्यानंतर रविवारी कोर्टात हजर करण्यात आलं. तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलीय.
सोलापुरातील सुप्रसिद्ध न्युरो सर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येनं सोलापूर जिल्हा हळहळला. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशातील हजारो रूग्णांवर त्यांनी उपचार केले होते. वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठं कार्य असणाऱ्या डॉ. वळसंगकरांनी आत्महत्या का केली, असा प्रश्न अनेकांना पडला. या प्रकरणात वळसंगकर हॉस्पिटल मधील प्रशासकीय महिला अधिकारी मनीषा मुसळे- मानेला शहर पोलिसांनी रात्री अटक केल्यानंतर खळबळ उडाली.

सुसाईड नोटमध्ये काय?
डॉ. वळसंगकर यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी मनीषा मुसळे हिचा उल्लेख केला होता.
महिलेच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या?
- हॉस्पिटलमध्ये आर्थिक गैरव्यवहार केल्याचा मनीषा मुसळे-मानेवर ठपका
- हॉस्पिटल मनीषा मानेवर कारवाईच्या तयारीत
- डॉ. शिरीष वळसंगकर यांना धमकी वजा मेल पाठवले
- महिलेच्या त्रासाला कंटाळून डॉ. शिरीष यांची पिस्तूलाने गोळ्या झाडून आत्महत्या
शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार
दुसरीकडे डॉ. वळसंगकर यांच्यावर शोसाकूल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. अंत्यदर्शनासाठी नातेवाईक, मित्र परिवार आणि त्यांच्या उपचारांनी बऱ्या झालेल्या अनेक रुग्णांनी गर्दी केली होती. हॉस्पिटलचे कर्मचाऱ्यांचा अश्रूंचा बांधही फुटला होता. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशातील हजारो रूग्णांवर त्यांनी उपचार केले. हजारो कुटुंबाला रोजगार दिला होता. कर्नाटक, तेलंगणा आमि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असं वळसंगकरांचं एसपीएम न्यूरो हॉस्पिटल १९९९ पासून रुग्णांच्या सेवेत आहे. रूग्णसेवा करत असताना ते सामाजिक कार्यातही अग्रेसर होते. वडिल पद्माकर वळसंगकर यांच्या शिकवणुकीचा त्यांच्यावर मोठा पगडा होता. केवळ डॉक्टरी पेशा म्हणून नव्हे तर नागरीकांना चांगल्या वैद्यकीय सेवा देण्यासाठी ते सातत्यानं प्रयत्नशील होते.
जगप्रवासाचं स्वप्न अपूर्णच
डॉ. शिरीष वळसंगकर यांनी संकल्प कायम पूर्ण केले, मात्र जग फिरण्याचं त्यांचं स्वप्न मात्र अपूर्णच राहिलं. जगाची सफर करण्यासाठी त्यांनी डबल डायमंड प्लेन खरेदी केलं होतं. तयारीही सुरू होती, मात्र त्यापूर्वीच त्यांनी आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं