पश्चिम महाराष्ट्र, कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज; विदर्भ-मराठवाड्यात किती पाऊस? हवामान विभागाचा अंदाज समोर

राज्यात मान्सूनचा पाऊस सक्रिया झाला असून लवकरच हा पाऊस महाराष्ट्र व्यापण्याची चिन्हं आहेत. नेमका हवामान विभागाचा अंदाज काय? सविस्तर जाणून घेऊ...

राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढला आहे. विविध जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात 14 जून रोजीही कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण विभागातील दोन जिल्ह्यांसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी देण्यात आला आहे. राज्यात सध्या पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाने 14 जून रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकणात हायअलर्ट देण्यात आला आहे.

पुढील 24 तास पावसाचे

राज्यातील विविध भागांसाठी हवामान विभागाकडून पुढील 24 तासांसाठी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही भागांत उत्तम पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. मात्र मुसळधार पावसात पिकांचं नुकसान होऊ नये, याची काळजी घेण्याची गरज आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये ढगाळ वातावरण राहील. छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरसह जालना, हिंगोली, परभणी, बीड, धाराशिव, नांदेड, लातूर या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाशिकमध्ये 14 जून रोजी ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. नाशिकमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. धुळे, नाशिक, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगार या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
नागपूरमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. अकोला, बुलढाणा, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, गडचिरोली, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबई, पुणे, कोकणाला इशारा

मुंबईत दिवसभर ढगाळ वातावरण राहील. मुंबईत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकण विभागात येणाऱ्या पालघर जिल्ह्यासाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ठाणे आणि सिंधुदुर्गसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी आणि रायगडसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुण्यात ढगाळ वातावरण राहील. पुण्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे, कोल्हापूर आणि सातारा येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

About Author

Rohit Shinde

Other Latest News