Father’s Day Marathi Wishes: वडील आणि त्यांच्या मुलांमधील नाते खूप खास असते. मुले त्यांच्या वडिलांच्या रागाची भीती बाळगतात, पण ते त्यांच्यावर खूप प्रेम करतात. वडील बाहेरून कठोर दिसतात, परंतु त्यांच्या मुलांसाठी मनाने खूप मृदू असतात. दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो. यंदा १५ जून रोजी फादर्स डे आहे आणि या खास प्रसंगी, तुम्ही या खास संदेशांद्वारे आपल्या वडिलांचा दिवस खास बनवू शकता.
‘फादर्स डे’ शुभेच्छा संदेश-
आपला बापच असा एक व्यक्ती असतो,
ज्याला वाटत की त्याचा मुलगा त्याच्यापेक्षा जास्त यशस्वी झाला पाहिजे.
पितृ दिनाच्या शुभेच्छा.!

वाडिलांसाठी दिवस नसतो तर
आयुष्यातील प्रत्येक दिवस वाडिलांमुळेच असतो.
हॅपी फादर्स डे!
डोळ्यात न दाखवताही जो आभाळा एवढं प्रेम करतो,
त्याला वडील म्हणतात.
फादर्स डे च्या शुभेच्छा!
माझे पहिले शिक्षक,
अखंड प्रेरणास्थान आणि प्रिय मित्र असणाऱ्या महान वडिलांना
पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
बाबा म्हणजे अशी व्यक्ती जी स्वतः दुःखी असतानाही
मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी धडपडत असते.
हॅपी फादर्स डे!
‘फादर्स डे’ शुभेच्छा संदेश-
खिसा रिकामा असूनही त्यांनी कधी नकार दिला नाही,
माझ्या वाडिलांपेक्षा श्रीमंत व्यक्ती मी पाहिला नाही.
हॅपी फादर्स डे!
कोडकौतुक वेळप्रसंगी धाकात ठेवी बाबा,
शांत,
प्रेमळ,
कठोर,
रागीट बहुरूपी बाबा.
हॅपी फादर्स डे!
माझ्या आयुष्यातील सर्वस्व असणाऱ्या
माझ्या बाबांना
पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुम्ही माझे हिरो आहात,
माझे मार्गदर्शक आहात आणि माझी सर्वात मोठी ताकद आहात.
तुमची अढळ ताकद आणि दयाळुता मला दररोज प्रेरणा देते.
तुम्ही सर्व प्रेम आणि आदराचे हक्कदार आहात,
आज आणि नेहमीच.
हॅपी फादर्स डे!