स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत अनुसूचित जाती-जमातींना १३ व ७ टक्के आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करणार, अनुसूचित जाती जमाती आयोगाची माहिती

अनुसूचित जाती जमातीच्या लोकांनी धर्म आणि जात लिहिताना शासनाने मान्यता दिलेल्या जातीनुसार आपली जात आणि धर्म नोंदवा, असेही आवाहन आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी यावेळी केले.

Scheduled Castes Commission – अनुसूचित जमातीकरिता एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. नुकतेच राज्य सरकारने अनुसूचित जमातीकरिता स्वंतत्र्य आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीकरिता सर्व महानगरपालिका, नगर पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये सरसकट १३ व ७ टक्के अनुक्रमे आरक्षण देण्याच्या तयारीत असल्याची माहिती अनुसूचित जाती जमाती आयोगाने दिली आहे.

मान्यता दिलेल्या जातीनुसार जात, धर्म नोंदवा

दरम्यान, त्यामुळे आगामी निवडणुका विचारात घेऊन येणाऱ्या जनगणनेत महाराष्ट्रातील अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तींनी आपला धर्म आणि शासनमान्य सूचित जाती व्यवस्थित नोंदवावी. मुंबई महानगरपालिकेमध्ये सन २०११ च्या जनगणनेनुसार वॉर्ड संख्या निर्धारित केलेली आहे. सर्वपक्षीय राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी या कामी लोकांना सहकार्य करावे. त्याचप्रमाणे, अनुसूचित जाती जमातीच्या लोकांनी धर्म आणि जात लिहिताना शासनाने मान्यता दिलेल्या जातीनुसार आपली जात आणि धर्म नोंदवा, असेही आवाहन आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी यावेळी केले.

आरक्षणाची शिफारस राज्य शासनाकडे करणार…

महाराष्ट्र शासनाने ज्या पद्धतीने इतर मागासवर्ग समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २७ टक्के आरक्षण दिले आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीकरिता सर्व महानगरपालिका, नगर पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये सरसकट १३ व ७ टक्के अनुक्रमे आरक्षण द्यावे, अशी शिफारस राज्य शासनाकडे करण्यात येणार आहे, असे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी सांगितले आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News