मरगळ झटकण्यासाठी काँग्रेसचे दोन दिवस गुजरातमध्ये अधिवेशन, कसा असणार कार्यक्रम?

काँग्रेसच्या अधिवेशनात अनेक ठराव मांडले जाणार, तसेच नवीन जबाबदारीचे वाटप होण्याची शक्यता...

मुंबई – लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नाही. यानंतर अनेक राज्यात काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत पराभूत व्हावे लागले. महाराष्ट्रातही काँग्रेसचा सुपडा साफ झालाय. यामुळे काँग्रेस पक्षात आलेली मरगळ झटकण्यासाठी काँग्रेसचे गुजरातमध्ये दोन दिवसीय अधिवेशन असणार आहे. 8 आणि 9 एप्रिल रोजी असे दोन दिवसीय काँग्रेसचे गुजरातमध्ये अधिवेशन असणार आहे.

दोन दिवसात काय?

दरम्यान, अहमदाबादमधील सरदार वल्लभाई पटेल राष्ट्रीय स्मारकात काँग्रेसची कार्यकारणी बैठक होईल. ते महात्मा गांधीच्या साबरमती आश्रमापर्यंत…, आश्रमात मेळावा होणार आहे. तसेच एआयसीसी अधिवेशनात ठराव स्वीकारला जाणार आहे. जरी या अधिवेशनातून सरदार वल्लभाई पटेल यांचा वारसा परत मिळवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असणार आहे, अशी माहिती समोर येत आहे. 2019 साली लोकसभा निवडणुकीपूर्वी सीडब्ल्यूसीची बैठक या ठिकाणी झाली होती. परंतु सरदार वल्लभाई पटेल ट्रस्टचे आजही नेतृत्व माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेसचे नेते दिनेशा पटेल करतात. आज संध्याकाळी काँग्रेसचे वरिष्ठ नेते साबरमती आश्रमाला भेट देतील. साबरमती आश्रम 1917 ते 1930 दरम्यान भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा आधारस्तंभ होते.

मरगळ झटकली जाणार?

एकीकडे काँग्रेस पक्षाला लालेली घरघर…, अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते काँग्रेसला रामराम ठोकून भाजपात व अन्य पक्षात प्रवेश करतात. त्यामुळे पक्षात लागलेले मरगळ झटकून टाकून त्यांच्यात उत्साह निर्माण करण्याचा काँग्रेस वरिष्ठांचा या अधिवेशनातून प्रयत्न असणार आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार राहुल गांधी, सोनिया गांधी तसेच अनेक राज्यातील वरिष्ठ नेते या दोन दिवसीय अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत.

 


About Author

Astha Sutar

Other Latest News