मुंबईतील रस्त्यांची कामे ३१ मे पूर्वी पूर्ण करा, अतिरिक्त पालिका आयुक्त यांचे निर्देश

सिमेंट कॉंक्रिट रस्त्यांची कामे आटोपती घेत असताना पावसाळ्यादरम्यान मुंबईकर नागरिकांना कोणत्याही प्रकारची असुविधा होणार नाही. यास महानगरपालिकेच्या सर्व यंत्रणांनी सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असेदेखील अतिरिक्त पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले आहे.

BMC : राज्यात मान्सून 7 जुन रोजी दाखल होणार आहे. यासाठी राज्यातील अनेक ठिकाणी पालिका प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबई पालिका प्रशासन सतर्क झाले आहे. पावसाळ्यात मुंबईची तुंबई होऊ नये, म्हणून तसेच नाले सफाई आदी कामे पावसाळापूर्व पूर्ण करा आणि यंत्रणा सज्ज ठेवा. तसेच मुंबईतील रस्त्यांची कामे ३१ मे पूर्वी पूर्ण करा, असे निर्देश अतिरिक्त पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले आहेत.

सध्या काँक्रिटीकरणाची काम करू नका…

दरम्यान, सध्या सुरू असलेली सर्व कामे दिनांक ३१ मे २०२५ पूर्वी सुरक्षित अवस्थेत आणावीत. सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे पूर्ण केल्‍यानंतर रस्‍त्‍याचा काही भाग अपूर्ण असेल तर मास्टिक अस्‍फाल्‍ट पद्धतीने ते काम पूर्ण करून रस्‍ते वाहतूक योग्य करावेत, असे स्पष्ट निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.

रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्प अंतर्गत पेव्हमेंट क्वालिटी काँक्रिट कामकाज (सिमेंट काँक्रिट ओतणे) (PQC) दिनांक २० मे २०२५ पासून बंद करण्यात आले आहे. दिनांक २० मे २०२५ नंतर रस्ते काँक्रिटीकरणाची कोणतीही नवीन काम सुरू करू नयेत. रस्‍ता वाहतुकीसाठी खुला करण्‍यापूर्वी रस्‍त्‍यांलगतच्‍या पावसाळी जलवाहिनीमध्‍ये प्रत्‍यक्षात पाणी टाकून त्‍या बरोबर आहेत की नाही याची खात्री करावी, असे निर्देशदेखील त्यांनी दिले आहेत.

कंत्राटदाराकडून दंडा आकारण्यात यावा…

दुसरीकडे सिमेंट कॉंक्रिटीकरण पूर्ण झाल्‍यानंतर रस्‍त्‍याचा काही भाग अपूर्ण असले तर सदर कामे दिनांक २० मे २०२५ ते दिनांक ३१ मे २०२५ दरम्यान मास्टिक अस्‍फाल्‍ट वापरून सुरक्षित अवस्थेत आणली जावीत. पेव्हमेंट क्वालिटी काँक्रिट (PQC) कामे दिनांक २० मे २०२५ पर्यंतच पूर्ण केली जातील. दिनांक २० मे २०२५ नंतर कोणतीही PQC कामे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) यांच्या संमतीशिवाय करण्यात येऊ नयेत.

कंत्राटदाराने दिनांक २५ मे २०२५ पर्यंत रस्ता सुरक्षित अवस्थेत आणण्यासाठी मास्टिक अस्‍फाल्‍टचे काम सुरू न केल्यास हे काम इतर उपलब्ध कंत्राटदारामार्फत संबंधित प्रकल्प ठेकेदाराच्या जोखीम व खर्चाद्वारे पूर्ण करण्यात यावे. ३१ मे २०२५ पर्यंत पूर्ण करणे बंधनकारक आहे. तसेच, प्रकल्पस्थळ सुरक्षित अवस्थेत आणण्यासाठी केलेल्या खर्चाच्‍या दुप्‍पट रकमेएवढी दंडात्मक रक्कम संबंधित कंत्राटदाराकडून आकारण्यात यावी, असे बांगर म्हणाले.


About Author

Astha Sutar

Other Latest News