लाडक्या बहिणींना कधी मिळणार एप्रिलचा हफ्ता? ‘या’ तारखेला तपासा बँक खाते!

शासन निर्णयानुसार इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ न घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत १५०० रुपये दरमहा सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली. महायुतीला मोठे बहुमत मिळाले. त्यामुळे दरमहा 1500 रुपये मिळणारा हफ्ता 2100 रुपये मिळणार अशी शक्यता होती. मात्र, वाढीव रक्कमेची घोषणा करण्यात आलेली नाही. मागील चार महिन्यांचे हफ्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. मात्र, एप्रिलचा हफ्त कधी मिळणार याचे उत्तर देखील समोर आले आहे.

30 एप्रिलला अक्षय तृतिया आहे. याच दिवशी महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत. मात्र सरसकट 1500 रुपये जमा होणार नाहीत. तर, काही महिलांच्य खात्यात 1500 तर काही महिलांच्या खात्यात 500 रुपये जमा होणार आहेत. या विषयी महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी माहिती दिली होती.

काय म्हणाल्या तटकरे?

शासन निर्णयानुसार इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ न घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत १५०० रुपये दरमहा सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे. तसेच, इतर शासकीय योजनांचा १५०० रुपयांपेक्षा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना उर्वरित फरकाची रक्कम सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येत आहे.त्याच शासन निर्णयाला अनुसरून नमो शेतकरी सन्मान योजनेचा दरमहा १००० रुपये लाभ घेत असलेल्या ७ लाख ७४ हजार १४८ महिलांना उर्वरित फरकाचे ५०० रुपये सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे.

एका महिलेला योजनेतून वगळणार नाही

आदिती तटकरे यांनी आश्वासित केले की एकाही महिलेला या योजनेतून वगळण्यात येणार नाही. त्यांनी म्हटले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सातत्याने अपप्रचार करणाऱ्या विरोधकांचे एकतर प्रशासकीय आकलन कच्चे आहे, किंवा योजनेच्या देदीप्यमान यशाने त्यांचे मनोबल खचले आहे. विरोधकांच्या या अपप्रचाराला माझ्या लाडक्या बहिणी बळी पडणार नाहीत ही मला खात्री आहे.


About Author

Arundhati Gadale

Other Latest News