छत्रपती शिवाजी महाराजांची 12 एप्रिल रोजी रायगडावर शिव पुण्यतिथी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित असणार

शिव समाधी जीर्णोधर आणि शिव पुण्यतिथी कार्यक्रम, दिग्गज हजेरी लावणार...

मुंबई – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तीन एप्रिल रोजी पुण्यतिथी होती. या दिवशी राज्यातील शिवप्रेमी रायगडवरती जाऊन महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेत त्यांना अभिवादन केले. यानंतर आता 12 एप्रिल रोजी रायगडावर पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम होणार आहे. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रायगडावर हजेरी लावणार आहेत.

अमित शहा प्रमुख पाहुणे…

दरम्यान, रायगडावर 12 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची 345 शिव पुण्यतिथी तसेच शिवसमाधी जीर्णोद्धार शताब्दी अभिवादनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. तसेच या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त काही कार्यक्रम करण्यात येणार आहेत. 12 एप्रिल रोजी शिव समाधी जीर्णोधर आणि शिव पुण्यतिथी असे कार्यक्रम होणार असल्याची माहिती शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे यांनी दिली आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हजर असणार आहेत. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, खासदार उदयनराजे भोसले, यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित असणार आहेतय

कार्यक्रमाची रूपरेषा कशी?

12 एप्रिल रोजी शिव पुण्यतिथी कार्यक्रम होणार आहे. या दोन दिवस चालणाऱ्या कार्यक्रमात शुक्रवारी समाधीला दीप वंदना दिली जाणार आहे. तसेच जागर, किर्तन शाहीरी पोवाड आदी कार्यक्रम होणार आहेत. शाहीर सुरेशराव सूर्यवंशी यांचा ‘ही रात्र शाहिरांची’ हा कार्यक्रम होणार आहे. दोन दिवस रात्रीचे भोजन आणि सकाळची न्याहारी आणि महाप्रसाद अशी व्यवस्था शिवाजी रायगड स्मारक मंडळातर्फे करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे यांनी दिली आहे. दुसरीकडे या कार्यक्रमास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्यातील मोठे नेते, मंत्री येत असल्यामुळे रायगडावरील सीसीटीव्ही दुरुस्तीचे काम जोरात सध्या सुरू आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News