मुंबई – मुंबई पोलिसांबाबत एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सोमवारी मुंबई पोलिसांना 100 दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमाअंतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात आले. दरम्यान, अद्यावत सुविधामुळे मुंबई पोलीस आता आणखी स्मार्ट होणार असून, गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांना आणखी मदत होणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सोमवारी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या विविध उपक्रमांचे लोकार्पण केले. त्यावेळी ते बोलत होते.
महिलांसाठी विशेष व्हॅन्स…
दरम्यान, पोलीस स्टेशनमध्ये स्वच्छता राखणे…, मुंबईतील पोलीस स्टशेमध्ये नागरिकांसाठी सुविधा तयार करणे, आदी कामांची पूर्तता केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंबई पोलिसांचे अभिनंदन केले. यावेळी सायबर गुन्ह्यांवर त्वरित कारवाईसाठी ‘राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांक 1930’ ची चित्रफित तयार करणारे निर्माते साहिल कृष्णानी आणि अता ऊर शेख यांचा गौरव करण्यात आला. आज अनेक ठिकाणी ‘भरोसा सेल’ सुरू केलेत. यातून महिलांना मदत मिळत आहे. तसेच पीडित महिलांसाठी विशेष व्हॅन्स तयार करण्यात आल्यात. पोलीस स्टेशनमध्ये महिला पोलीस अधिकाऱ्यांची संख्या मोठी आहे. म्हणून त्या महिला पोलीस अधिकाऱ्यांना सुविधा आणि व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे सायबर सुरक्षिततेसंदर्भात 3 लॅब सुरू करण्यात आल्या आहेत.

न्यायव्यवस्थेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला…
महासायबर हेडक्वार्टर तयार केले आहेत. आज सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण लॅब तयार करण्यात येईल. देशांतर्गत सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी 1930 तर राज्यात स्तरावर 1945 असे हेल्पलाईन नंबर आहेत. ‘मिशन कर्मयोगी’ अंतर्गत पोलिसांना नवीन कायद्यांबाबत प्रशिक्षणही देण्यात आलेय. तीन नवीन फौजदारी कायद्यांमुळे गुन्हेगारी आटोक्यात येईल. तसेच या नवीन कायद्यामुळे न्यायव्यवस्थेकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलला आहे. हे नवीन कायदे प्रभावीपणे राबवून जनतेला न्याय देण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.