महाराष्ट्राचा वाळवंट करण्याचे भाजपाने जाहीर करावे, झाडांच्या कत्तलीवरुन आदित्य ठाकरेंचा महायुतीवर प्रहार…

पालघरमधील गारगाई प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. पण यामुळं ५ लाख झाडांची कत्तल होणार आहे. झाडांची कत्तलीमुळे पर्यावरणाची हानी होणार आहे. पैशांचा खेळ करण्यासाठी पर्यावरणाचा खेळ सुरु आहे. आम्ही विकास विरोधी नाही, पण विनाश विरोधी आहोत. त्यामुळं महाराष्ट्राचा वाळवंट करण्याचे भाजपाने जाहीर करावे.

मुंबई – मुंबईत पाण्याची समस्या आहे, मुंबईतील विविध भागात पाणी कपात सुरु आहे. याविरोधात शिवसेना पक्षाने मुंबईत वॉर्डनिहाय पालिका विभागीय कार्यालयावर हांडा मोर्चा काढला. पण आमच्या कार्यकर्त्यांना नोटीसा पाठवल्या. सरकारमुळं पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. सध्या मुंबईत पाण्याचा प्रश्नामुळं सामाजिक वाद निर्माण झाला आहे. याला महायुती सरकार कारणीभूत असल्याची टिका शिवसेना (ठाकरे) आमदार आदित्य ठाकरेंनी केली. पत्रकार परिषद ते बोलत होते.

विकासाच्या नावाखाली विनाश…

दरम्यान, अनेक प्रकल्पामुळं ताडोबा, पैनगंगा येथील वृक्षांना फटका बसणार आहे. मुंबईत विकासाच्या नावाखाली झाडांची कत्तल करण्यात आली. ठाण्यात जुनी झाडं तोडण्यासाठी चक्क झाडांची वय कमी दाखवली आहेत, हे खूप गंभीर आहे. जर ज्या गारगाईमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, तिथली झाडं तोडली तर तिथे पाऊस कसा पडणार? असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला. मग पाणी गारगाईमध्ये येणार कुठून? हे सगळे कॉन्ट्रकरसाठी सुरु आहे. कॉन्ट्रकरच्या भल्यासाठी हे उद्योग सुरु आहेत. गारगाई धरणाबाबत अभ्यासक, पर्यावरण तज्ज्ञ यांची मतं घेतली पाहिजेत. महाराष्ट्राचा विकासाच्या नावाखाली विनाश सुरु आहे. अशी बोचरी टिका ठाकरेंनी सरकारवर केली. पालघरमधील गारगाई प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. पण यामुळं ५ लाख झाडांची कत्तल होणार आहे. झाडांची कत्तलीमुळे पर्यावरणाची हानी होणार आहे. पैशांचा खेळ करण्यासाठी पर्यावरणाचा खेळ सुरु आहे. आम्ही विकास विरोधी नाही, पण विनाश विरोधी आहोत. त्यामुळं महाराष्ट्राचा वाळवंट करण्याचे भाजपाने जाहीर करावे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

तीन तिघाडीत महाराष्ट्राचे नुकसान…

घाटकोपरमध्ये पुन्हा एकदा मराठी-अमराठी वाद दिसला. असा घटना भाजपाचे सरकार आल्यानंतर होताहेत. पण तुमची भाषा… तुमचे विचार कोणावर लादता कामा नये. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलले पाहिजे. त्यांची भूमिका मांडली पाहिजे… विरोध केला पाहिजे… मग आम्ही समजू की हे महाराष्ट्र सरकार आहे. नाहीतर हे गुजरातचे सरकार आहे, असे आम्ही समजू, असा टोला आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लगावला. महायुतीच्या दंगली, हिंसाचार या घटना वाढल्या आहेत. मग गृहखाते काय करताहेत. गृहमंत्री हे विरोधी पक्षाच्या मागे लागलेत. विरोधकांना त्रास देणे, एवढेच गृहमंत्री काम करताहेत. तीन तिघाडीत महाराष्ट्राचे नुकसान होत आहे. राज्यातील गुन्हेगारांना आळा घालण्यास गृहमंत्री आणि महायुती सरकार अपयशी ठरले आहे. मुख्यमंत्री निर्णय घेऊ शकत नाही. महाराष्ट्रात उद्योग-धंदे येत नाहीत. असं आदित्य ठाकरे म्हणाले.

मुलांना भाषा पेलवेल का?

हिंदी भाषा सक्तीची करत असताना, तेवढी सरकारकडे यंत्रणा सक्षम आहे का? देशात जाती-धर्मावरुन वाद सुरु आहे हे दुर्दैव आहे. ज्या देशात संशोधन महत्त्वाचे आहे. माझा कुठल्या भाषेला विरोध नाही, पण नवीन भाषा आणत असताना, ती कोणत्या इयत्तेत आणतोय. ती त्यांना सुटेबल होते का? हे पाहिले पाहिजे. भाषेचा मुद्दा राजकीय फायद्यासाठी आणला जात आहे. अशी टिका आदित्य ठाकरेंनी सरकारवर केली.


About Author

Astha Sutar

Other Latest News