भिवंडीत पहिल्या बागेश्वर बालाजी मंदिराची स्थापना, मंत्रोच्चारात प्राणप्रतिष्ठा सोहळा

धीरेंद्र शास्त्री हे मध्य प्रदेशात छतरपूर येथे बागेश्वर धाम येथे दिव्य दरबार घेत भक्तांच्या समस्या ऐकुण घेत असताता तसेच त्यांना उपाय सांगत असतात. तसा दरबार महाराष्ट्रात होणार की नाही याबाबत भक्तांमध्ये उत्सुकता होती.

भिवंडी : मध्यप्रदेशातील बागेश्वर धामला जाण्यासाठी महाराष्ट्रातील भक्तांना अडचणीचा सामना करावा लागतो. त्यामुळे येथील भक्तांसाठी राज्यातील पहिले बागेश्वर बालाजी मंदिर उभारण्यात आले. आज (सोमवारी) मंदिरातील मूर्त्यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

पंडीत धीरेंद्र शास्त्री म्हणाले, बागेश्वर बालाजी सनातन मठाच्या स्थापनेमुळे आर्थिक अडचणी आणि इतर कारणांमुळे जे महाराष्ट्रातील, मुंबई जवळील भक्त मध्य प्रदेशात येऊ शकत नव्हते त्यांच्या दर्शनाची व्यवस्था येथेच झाली आहे. भिवंडीतील या सनातन मठामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा संकल्प देखील पूर्ण होईल.

जेथे आव्हान तेथेच मठ

पंडीत धीरेंद्र शास्त्री यांना महाराष्ट्रातील नागपूरमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून आव्हान देण्यात आले होते. ते जे चिठ्ठ्यापाहून भक्तांवर उपाय करतात ते फेक असल्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून सांगण्यात आले होते. ज्या महाराष्ट्रात पंडीत धीरेंद्र शास्त्री यांना आव्हान मिळेला तेथे त्याच महाराष्ट्रातील भिवंडीमध्ये त्यांनी बागेश्वर बालाजीचा पहिले मंदीर उभारले.

भिवंडीतही दिव्य दरबार

धीरेंद्र शास्त्री हे मध्य प्रदेशात छतरपूर येथे बागेश्वर धाम येथे दिव्य दरबार घेत भक्तांच्या समस्या ऐकुण घेत असताता तसेच त्यांना उपाय सांगत असतात. तसा दरबार महाराष्ट्रात होणार की नाही याबाबत भक्तांमध्ये उत्सुकता होती. मंदिरात दरबाराठी सभा मंडप बांधण्यात आला आहे. त्यामुळे एक दोन महिन्यात धीरेद्र शास्त्री यांचा दिव्य दरबार देखील भिवंडीतील मंदिरात होईल, असे सांगितले जात आहे.

 


About Author

Arundhati Gadale

Other Latest News