लातूर : लातूर महापालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहपोलरे यांनी दोन दिवसांपूर्वी स्वतःवर गोळीबार करत आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी मुंबईतील कोकीलाबेन रुग्णालयात हलवण्यात आलेले आहे. मात्र, दोन दिवस होऊनही मनोहरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला? याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. त्यातच मनोहरे कुटुंबीयांना धक्कादायक दावा केला आहे.
मनोहरे कुटंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबासाहेब यांनी आपल्या कुटुंबासोबत जेवण केले. त्यानंतर ते त्यांच्या रुममध्ये गेले. त्यावेळी त्यांना एक फोन आला होता. या फोननंतर त्यांनी स्वतःवर गोळीबार केला. तो फोन नेमका कोणी केला होती हे अजुन स्पष्ट झालेले नाही.

बाबासाहेब मनोहरे हे जेवण झाल्यानंतर त्यांच्या रुममध्ये गेले तेव्हा मोठा आवाज आला त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी तिकडे धाव घेतली. बाबासाहेब हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांना तत्काळ लातूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाबासाहेब यांनी स्वतःवर गोळी चालवून आत्महत्येचा प्रयत्न केला. गोळी त्यांच्या डोक्याच्या उजव्या बाजुला लागली.
गोळी डोक्यात लागल्याने कवटीचे हाड फुटलेआणि त्याचे तुकडे मेंदुत गेले आहेत त्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्या अजुन शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असल्याने त्यांना मुंबईतील खासगी रुग्णालयात एअर एब्युलन्सने हलवण्यात आले आहे.
कोण आहेत बाबासाहेब मनोहरे?
बाबासाहेब मनोहरे वरिष्ठ अधिकारी सध्या ते लातूर महापालिकेचे आयुक्त म्हणून काम पाहत आहेत. लातूर महापालिकेत आयुक्त म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी ते नांदेड महापालिकेत सहआयुक्त म्हणून कार्यरत होते. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांना काम करण्याच अनुभव आहे.
पोलिस तपास सुरू
पोलिसांना बाबासाहेब मनोहर यांच्या रुममध्ये पोलिसांना एक पिस्टल, रिकामी बुलेट, दोन मोबाईल काही कागदपत्र मिळाली आहेत. ती त्यांनी ताब्यात घेतली आहेत. मात्र, आत्महत्येचे प्रयत्नाचे नेमके कारण काय याचा तपास पोलिस करत आहेत.