मुंबई: महाराष्ट्रात 1 मे 1025 पासून दूधाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. अमूल आणि मदर डेअरी या प्रमुख दूध ब्रँड्सने त्यांच्या विविध दूध प्रकारांच्या दरात वाढ केली आहे. यामुळे शहरी भागातील दुध खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मात्र यामुळे फटका बसणार आहे. मे महिना सुरू होताचा ग्राहकांना महागाईचा फटका बसला आहे.
कोणत्या ब्रँडची किती दरवाढ?
अमूल आणि मदर डेअरी या प्रमुख दूध ब्रँड्सने त्यांच्या विविध दूध प्रकारांच्या दरात प्रति लिटर ₹2 वाढ केली आहे. या वाढीमुळे अमूल स्टँडर्ड, गोल्ड, ताज, चाय मजा, स्लिम अँड ट्रिम, म्हशीचे दूध आणि गाय दूध यांचे दर आता ₹2 प्रति लिटर वाढले आहेत. विशेष म्हणजे या दरवाढीचा परिणाम घरगुती बजेटवर होणार आहे, विशेषतः मध्यमवर्गीय आणि निम्नवर्गीय कुटुंबांवर. दूधाच्या दरवाढीमुळे इतर दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीतही वाढ होण्याची शक्यता आहे. तथापि, दूध उत्पादक संघटनांनी या वाढीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, कारण यामुळे त्यांच्या उत्पादन खर्चाची भरपाई होईल आणि त्यांना त्यांच्या मेहनताचे योग्य मोबदला मिळेल.

दरवाढ का केली?
या दरवाढीबाबत सांगितली जाणारी काही महत्वाची कारणे आहेत, त्यामध्ये या दरवाढीचे मुख्य कारण म्हणजे दूध उत्पादन खर्चात झालेली वाढ. पशुखाद्य, चारा, इंधन आणि श्रम यांसारख्या घटकांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे दूध उत्पादकांवर आर्थिक दबाव वाढला आहे. या वाढीमुळे दूध उत्पादकांना त्यांच्या मेहनताचे योग्य मोबदला मिळण्याची शक्यता आहे.
अमूल दूधचा मोठा ग्राहक भारतामध्ये आहे. अमूल हा भारतातील सर्वात मोठा दुग्धजन्य पदार्थांचा ब्रँड आहे. कंपनीने दुधाच्या किमतीत बदल केल्यानंतर आता ग्राहकांना दुधासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.अमूल कंपनीकडून म्हैस आणि गायीच्या दूध दरात दोन रूपयांनी वाढ केली आहे. अमूलने बुधवारी ही घोषणा केली. ही वाढ सर्व प्रकारच्या दुधावर लागू असणार आहे. त्यामुळे आता ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार हे निश्चित आहे.