जोडीदार खोटं बोलत आहे कसं ओळखायचं? ‘या’ आहेत सोप्या ट्रिक्स

चेहरा खूप काही सांगून जातो, तो खोटे बोलणे देखील सहज पकडू शकतो. जेव्हा कोणी खोटे बोलते तेव्हा त्याच्या पापण्या जास्त वेळा फडफडू लागतात.

How to know if your partner is lying:  जेव्हा तुम्ही ज्या व्यक्तीवर खूप प्रेम करता आणि ज्यावर तुम्ही खूप विश्वास ठेवता ती व्यक्ती तुमच्याशी खोटे बोलते तेव्हा तुमचे मन तुटते. विशेषतः जेव्हा त्याचे खोटे दुसऱ्या कोणाकडून उघड होते. कोणत्याही नात्यात विश्वास सर्वात महत्वाचा असतो. जर दोन व्यक्तींमध्ये विश्वास नसेल तर त्या नात्याचे भविष्य असू शकत नाही.

जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा जोडीदार तुमच्याशी खोटे बोलत आहे. तर आधी  पुराव्याच्या आधारे या संशयाची पुष्टी करा. संशय घेऊन नाते बिघडवण्याऐवजी, सत्य शोधून काढले तर बरे होईल. या टिप्स तुमच्यासाठी उपयुक्त ठरतील…

 

वागण्यात अचानक बदल होणे-

तो तुमच्याशी त्याच्या रोजच्या वागण्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने वागेल. जेव्हा तुम्ही एखाद्यासोबत बराच काळ राहत असता तेव्हा तुम्हाला माहिती असते की तुमचा जोडीदार एखाद्या विशिष्ट परिस्थितीत कसा वागेल.

पण अचानक त्याचे वर्तन बदलू लागते. जेव्हा तुमचा जोडीदार दुसऱ्या कोणाशी तरी प्रेमसंबंध सुरू करतो तेव्हा तो दुसऱ्या खोलीत तासांतास फोनवर बोलतो, पण जेव्हा तुम्ही विचारता तेव्हा तो म्हणतो की तो बातम्या वाचत होता आणि मेल तपासत होता.

 

आवाज बदलणे-

जर एखाद्या व्यक्तीच्या बोलण्याच्या शैलीत अचानक बदल झाला, तर हे देखील खोटे बोलण्याचे लक्षण आहे. अशा परिस्थितीत आवाज कमी होऊ लागतो आणि समोरची व्यक्ती काहीतरी लपवत असल्याचे स्पष्ट होते.

 

पापण्यांची हालचाल-

चेहरा खूप काही सांगून जातो, तो खोटे बोलणे देखील सहज पकडू शकतो. जेव्हा कोणी खोटे बोलते तेव्हा त्याच्या पापण्या जास्त वेळा फडफडू लागतात. तो आतून हे प्रकरण संपण्याची वाट पाहत आहे. असे लोक डोळ्यात डोळे घालून बोलणे देखील टाळतात.

 

सतत ओठ चावणे-

खोटे बोलण्यापूर्वी, ती गोष्ट मनात कोरली जाते. अशा परिस्थितीत दोन्ही ओठांमध्ये कंपन दिसून येते आणि खोटे बोलणारी व्यक्ती अनेकदा ओठ चावू लागते. इथे तुम्ही त्याचा खोटेपणा सहज पकडू शकता.


About Author

Aiman Jahangir Desai

Other Latest News