केसांची काळजी घेण्यासाठी आपण अनेकदा महागडे उत्पादने वापरतो, पण तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या घरात असा एक खजिना लपलेला आहे जो तुमचे केस मजबूत, जाड आणि चमकदार बनवू शकतो? टक्कल पडण्याची भीती वाटत असेल तर दालचिनीचा हेअर मास्क वापरणे फायद्याचे ठरू शकते. दालचिनी हा केवळ एक स्वादिष्ट मसाला नाही तर त्याचे केसांसाठीही अनेक फायदे आहेत. यामध्ये असलेले गुणधर्म केसांना अनेक समस्यांपासून वाचवतात आणि त्यांना निरोगी ठेवतात.
दालचिनी आणि ऑलिव्ह ऑइल हेअर मास्क
दालचिनी आणि ऑलिव्ह ऑइलचे मिश्रण केसांसाठी एक अद्भुत देणगी आहे. दालचिनीमध्ये अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात जे केस मजबूत करतात, केस गळणे कमी करतात आणि कोंडा कमी करतात. ऑलिव्ह ऑइल केसांना खोलवर पोषण देते, ज्यामुळे ते मऊ आणि चमकदार बनतात.

साहित्य
- दालचिनी पावडर
- ऑलिव्ह ऑइल
- मध
कृती
एका भांड्यात दालचिनी पावडर, ऑलिव्ह ऑइल मिक्स करा. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही त्यात १ चमचा मध देखील घालू शकता. मिश्रण चांगले एकजीव होईपर्यंत मिक्स करा. तयार मिश्रण टाळूवर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. हे मिश्रण 15-20 मिनिटे तसेच राहू द्या. नंतर सौम्य शैम्पूने केस धुवा.
हळद आणि दालचिनीचा हेअर मास्क
हळद आणि दालचिनी, हे दोन मसाले केवळ स्वादिष्टच नाहीत तर औषधी गुणधर्मांनीही समृद्ध आहेत. हे दोन्ही मसाले केसांसाठी खूप फायदेशीर आहेत. हळदीमध्ये दाहक-विरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात जे कोंडा आणि खाज कमी करण्यास मदत करतात. तसेच, ते केसांना मजबूत करते आणि केस गळणे कमी करते. दालचिनीमध्ये अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म देखील असतात जे टाळू निरोगी ठेवतात आणि केसांच्या वाढीस मदत करतात. या दोन्ही मसाल्यांच्या मिश्रणाने बनवलेला हेअर मास्क तुमच्या केसांसाठी वरदान ठरू शकतो. चला जाणून घेऊया हा हेअर मास्क बनवण्याची सोपी पद्धत..
साहित्य
- हळद पावडर
- एक चमचा दालचिनी पावडर
- 2-3 चमचे नारळ तेल किंवा ऑलिव्ह तेल.
कृती
एका भांड्यात हळद पावडर आणि दालचिनी पावडर मिक्स करा. त्यामध्ये नारळ तेल किंवा ऑलिव्ह तेल मिक्स करून पेस्ट तयार करा. हे मिश्रण तुमच्या टाळूला आणि केसांना व्यवस्थित लावा. 15-20 मिनिटे तसेच राहू द्या. नंतर कोमट पाण्याने आणि सौम्य शैम्पूने केस धुवा.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)