पुणे : एप्रिल महिन्यात आज (सोमवारी) अजित पवार तिसऱ्यांदा शरद पवारांना बैठकीच्या निमित्ताने भेटले. या महिन्यात मागील 15 दिवसांतील ही तिसरी भेट होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चा आहेत. मात्र, या सर्व चर्चा अजित पवारांना फेटाळल्या आहेत.
सहा एप्रिलाल अजित पवारांचे चिरंजीव जय पवार यांचा साखरपुडा पुण्याजवळी घोटावडे येथील फाॅर्म हाऊसवर झाला. पवार कुटुंबातील या कार्यक्रमाला शरद पवार हे देखील उपस्थित होते. अजित पवारांनी त्यांचे समारंभामध्ये स्वागत केले होते.

रयतच्या बैठकीत एकत्र
जय पवार यांच्या साखरपुड्यातील भेटीनंतर 12 एप्रिलला रयत शिक्षण संस्थेच्या सातरामधील कार्यालयात बैठकीसाठी शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले होते. या बैठकीत अजित पवार हे शरद पवारांशी बोलत असल्याचे व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. आज साखर संकुलात शरद पवार-अजित पवार यांची तिसऱ्यांदा भेट झाली.
अजित पवार काय म्हणाले?
पत्रकारांनी शरद पवारांसोबत तिसऱ्यांदा भेट झाली याविषयी अजित पवारांना विचारले असता ते म्हणाले, साखपुडा हा घरगुती समारंभ होता. पवार कुटुंबीय म्हणून आम्ही एकत्र आलो होते. बाकीच्यांनी त्यावर मत व्यक्त करण्याचे काही कारण नाही.तसेच रयत बैठकीत माझ्यासोबत इतर पक्षाचे लोक देखील होते. तेथे मी उपमुख्यमंत्री म्हणून गेलो नव्हतो रयतचा सदस्य, ट्रस्टी म्हणून गेलो होतो, असे देखील अजित पवार म्हटले.
साखर संकुलातील बैठक कशासाठी?
अजित पवारांनी सांगितले की, आजची बैठक ही कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करण्यासंदर्भात होती. शेतकऱ्यांच्या हितासाठी AI चा वापर कसा करता येईल, शेतकरी बांधवांना सुगीचे दिवस आणणं यांसारख्या विषयांवर सखोल चर्चा पवारसाहेब आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंच्या उपस्थितीमध्ये झाल्याचे सांगितले..