अश्विनी बिद्रे हत्याकांडातील मुख्य आरोपीला जन्मठेप; 9 वर्ष जुन्या प्रकरणाचा अखेर निकाल

9 वर्षांपूर्वी 2016 मध्ये घडलेल्या या भयंकर गुन्ह्यात अखेर आज न्यायालयाने निकाल दिला आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडात पनवेल सेशन कोर्टाने अखेर नऊ वर्षांनंतर आपला निर्णय दिला आहे. कोर्टाने या हत्याकांडातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आहे, सोबतच 20 हजारांचा दंड ठोठावला आहे, कोर्टाने इतर दोन आरोपी कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांना सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. मात्र कोर्टाने या दोन्ही आरोपींना तुरुंगातून सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. दोघांनी आपली शिक्षा पूर्ण केली आहे. दोघेही अटकेनंतर पुढील सात वर्षे तुरुंगात होते.

2016 मध्ये झाली होती हत्या…

2016 मध्ये मीरा रोडमध्ये वरिष्ठ निरीक्षक अभय कुरुंदकर याने सहकारी अश्विनी बिद्रे यांची अत्यंत क्रूरपणे हत्या केली होती. अभय कुरुंदकरने मीरा रोड येथील आपल्या घरात अश्विनी बिद्रेच्या डोक्यावर शस्त्राने वार करीत तिची हत्या केली होती. हत्येनंतर कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांच्या मदतीने अश्विनीच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले होते.

अश्विनीचा मृतदेह कधीच सापडला नाही…

अश्विनीच्या मृतदेहाचे काही तुक़डे फ्रिजमध्ये ठेवण्यात आले होते. यानंतर एक-एक तुकडा वसईच्या खाडीत फेकून देण्यात आले. बऱ्याच प्रयत्नानंतरही पोलिसांना अश्विनीचा मृतदेह सापडला नाही. अश्विनी बिद्रे हिने हत्येपूर्वी अभय कुरुंदकर याची भेट घेतली होती. यानंतर दोघेही मीरा रोड येथील कुरुंदकरच्या घरी गेले होते. पोलिसांनी अश्विनी बिद्रेचा मोबाइल फोन, लॅपटॉप आणि कुरुंदकरच्या मोबाइल फोनमधून डेटा ताब्यात घेतला होता. अश्विनी बिद्रे आणि मुख्य आरोपी अभय कुरुंदकर सांगलीमध्ये एकत्र काम करीत होते.

 

 

 

 

 

 

 


About Author

Smita Gangurde

Other Latest News