घणसोली बस डेपोत मोठी आग, तीन ते चार बसेस जळून खाक झाल्याची माहिती समोर

आग आज सकाळी लागली आहे. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती मिळत आहे. परंतु ही आग मोठी असून अग्निशमन दलाच्या पाच ते सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

Ghansoli Fire – मंगळवारी मुंबईतील नरिमन परिसरात आग लागल्याची घटना ताजी असताना, आता नवी मुंबईत आग लागल्याची माहिती समोर येत आहे. नवी मुंबईतील घनसोली एसटी डेपो येथे मोठी व भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आग लागल्याची बातमी समजताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करताहेत.

चार ते पाच बसेस जळून खाक…

दरम्यान, ही आग आज सकाळी लागली आहे. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती मिळत आहे. परंतु ही आग मोठी असून अग्निशमन दलाच्या पाच ते सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तसेच या आगीत तीन ते चार गाड्या जळून खाक झाल्याची ही माहिती समोर येत आहे. सध्या आग सुरू असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. पण ही आग नेमकी कशामुळं लागली याचे अद्याप कारण समोर येत नाही.

वारंवार आगीच्या घटना…

मुंबई असे उपनगर असो किंवा राज्यातील अनेक भागात वारंवार आगीच्या घटना घडतात. त्यामुळे ही बाब गंभीर असून आगीच्या घटनाबाबत आणि सुरक्षा याबाबत आपण अधिक गंभीर आणि जागरूक नसल्यास यावरून दिसत आहे. आग लागल्यानंतर ती विझविण्यासाठी जी तत्काळ जवळपास यंत्रणा लागते, ती यंत्रनाही जवळ नसते. फायर ऑडिट होणं गरजेचं असलं असं बोललं जात आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News