फडणवीस सरकारचे 100 दिवसांचं प्रगतीपुस्तक आले; कोणता मंत्री कार्यक्षम? तर कोण फेल?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील महायुती सरकारच्या मंत्र्यांचं आणि त्यांच्या खात्याचं प्रगतीपुस्तक समोर आलं आहे. यामध्ये कोणते मंत्री फेल तर कोण सरस ठरलंय, ते जाणून घ्या...

मुंबई: राज्यात महायुती सरकार अस्तित्वात आल्यानंतर शासनाच्या 48 विभागांना 100 दिवसांचा धोरणात्मक कार्यक्रम हाती घेतला होता. आता त्याबाबतचे रिपोर्ट कार्ड अथवा अहवाला सरकारने जारी केला आहे. यामध्ये कोणता विभाग अथवा मंत्र्याने सरस कामगिरी केली, उद्दीष्ट पूर्ण केले ते सांगण्यात आले आहे. तर दुसरीकडे कोणता विभाग अथवा मंत्री फेल ठरला हेही सांगण्यात आलं आहे. त्याबाबत सविस्तर समजून घेऊ.

78% टार्गेट उद्दीष्टे पूर्ण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती सरकारच्या स्थापनेनंतर राज्य प्रशासनात सुधारणा घडवून आणण्यासाठी 100 दिवसांचा कृती आराखडा जाहीर केला होता. या आराखड्याचा मुख्य उद्देश प्रशासनात पारदर्शकता, जवाबदारी आणि वेग वाढविणे असा होता. त्यामधून समोर आलेल्या निष्कर्षानुसार सरकारने 100 दिवसांमधये सरकारने आपली 78 टक्के उद्दीष्टे साध्य केली आहेत. गेल्या 100 दिवसात या सर्व विभागांनी निश्चित केलेल्या 902 धोरणात्मक उद्दिष्टांपैकी 706 उद्दिष्टे (78%) पूर्णतः साध्य केली आहेत तर उर्वरित 196 उद्दिष्टे पूर्ण होईपर्यंत संबंधित विभाग आपले काम चालूच ठेवतील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.

कोण सरस, कोण फेल?

मंत्री हसन मुश्रिफांचा वैद्यकीय शिक्षण विभाग, प्रकाश आबिटकरांचा सार्वजनिक आरोग्य विभाग, आशिष शेलारांचा माहिती तंत्रज्ञान विभाग, बाबासाहेब पाटील यांचा सहकार विभाग या विभागांना यामध्ये धोरणात्मक ध्येय अतिशय चांगल्या प्रकारे पूर्ण केले आहे.  विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अखत्यारीत असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने देखील चांगली कामगिरी केली आहे.

तर दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीसांचे अखत्यारीत असणारे सामान्य प्रशासन, धनंजय मुंडेंन मंत्रिपदाचे राजीनामा दिलेले अन्न पुरवठा खाते देखील फेल ठरले आहे, विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांकडे असलेल्या बहुतेक विभागांना आपली उद्दीष्टे गाठता आली नसल्याचे चित्र आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News