प्रवास करत असताना अनेकांंना मळमळ किंवा उलट्या होण्याचा त्रास होतो. हा एक प्रकारचा मानसिक त्रास असतो. प्रवास करताना अनेकांच्या मनात ही भीती असते की त्यांना उलटी तर होणार नाही. प्रवासाचा नुसता उल्लेख केला तरी त्यांना मळमळ सुरु होते. अशा व्यक्तींना प्रवासादरम्यान उलट्या येणे, चक्कर येणे, मळमळणे अशा समस्यांचा सामना करावा लागतो. असा त्रास होत असेल तर काय उपाय केला पाहिजे जाणून घ्या.
आल्याचा उपयोग करा
आले हां उलटी रोखण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे. प्रवासाला निघण्यापूर्वी आल्याचा तुकडा चोखावा किंवा आले पाण्यात उकळून आल्याचा चहा प्यावा. यामुळे पोटातील गॅस आणि मळमळ कमी होण्यास मदत होते. तसेच आल्यामुळे मोशन सिकनेसची लक्षणे देखील कमी होतात. जर हे शक्य नसेल तर आलेपाक, आल्याचे चॉकलेट किंवा गोळी चघळावी.

पुदिन्याचा वापर
पुदिन्याचा सुगंध मळमळ कमी करण्यासाठी प्रभावी ठरतो. प्रवासादरम्यान पुदिन्याच्या पानांचा उपयोग करावा. पुदिन्याची पानं चघळत राहावं. या नैसर्गिक पद्धतीने आपल्याला उलटी होण्याची शक्यता कमी होईल आणि प्रवासाचा त्रासही कमी होईल.
लिंबूपाणी आणि साखर
लिंबूपाणी आणि साखर प्रवासादरम्यान पिणे हा एक उत्तम उपाय आहे. लिंबूपाण्यामध्ये व्हिटॅमिन सी असते, जे मळमळ थांबविण्यासाठी मदत करते. साखर शरीराला उर्जेचा पुरवठा करते आणि प्रवासादरम्यान आलेला थकवा कमी करण्यास मदत करते.
बडीशेप
जर तुम्हाला सकाळी प्रवास करायचा असेल तर रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाण्यात एक चमचा जिरे, धणे आणि बडीशेप भिजवा आणि सकाळी सेवन करा. प्रवासात उलट्या होणार नाहीत.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)