Hair Care Tips: कोणत्या व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे गळतात केस? तुम्हालाही माहिती असणे गरजेचे

Hair loss home remedies: कोणत्या व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे गळतात केस? जाणून घ्या

Hair care tips in Marathi:  केस गळणे ही केवळ सौंदर्याशी संबंधित समस्या नाही तर ती तुमच्या भावनिक आरोग्यावरही खोलवर परिणाम करू शकते. जरी आनुवंशिकता आणि वृद्धत्व हे यामागील कारण असू शकते, परंतु केस पातळ होणे आणि टक्कल पडण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे व्हिटॅमिनची कमतरता होय. कारण निरोगी केसांच्या वाढीमध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे महत्वाची भूमिका बजावतात. त्यांच्या कमतरतेमुळे केसांच्या समस्या सुरू होतात.

केस विंचरताना किंवा धुताना दररोज काही केस गळणे सामान्य आहे. पण जर तुमचे केस दररोज जास्त गळत असतील आणि तुम्ही हळूहळू टक्कल पडण्याकडे वाटचाल करत असाल तर तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. कारण केस गळणे हे व्हिटॅमिनच्या कमतरतेसह एखाद्या आजाराचे लक्षण असू शकते. म्हणून, या संदर्भात डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या. केस गळतीचे कारण कोणते जीवनसत्व असू शकते ते आपण जाणून घेऊया..

कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे गळतात केस- 

व्हिटॅमिन बी-

व्हिटॅमिन बी  ला बायोटिन म्हणतात. तज्ज्ञांच्या मते केसांच्या वाढीसाठी बायोटिन खूप महत्वाचे आहे. बायोटिन हे केसांसाठी एक पूरक पोषकतत्व आहे. जे त्यांना पोषण देते. व्हिटॅमिन बी७ च्या कमतरतेमुळे केस गळतात आणि केस पातळ, कमकुवत होतात आणि दुभंगतात. फॉलिक अॅसिड, बी६ आणि बी१२ सारख्या इतर बी जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे देखील केस गळू शकतात.

व्हिटॅमिन ई-

व्हिटॅमिन ईच्या कमतरतेमुळे टाळूमध्ये ऑक्सिडेटिव्ह ताण येतो, ज्यामुळे केसांची मुळे कमकुवत होतात आणि केस गळतात. त्यामुळे व्हिटॅमिन ई अत्यंत महत्वाचे आहे.

व्हिटॅमिन डी-

केस गळणे किंवा टक्कल पडण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे व्हिटॅमिन डीची कमतरता होय. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे केस कमकुवत होतात आणि तुटू लागतात. यामुळे टक्कल पडणे किंवा केस गळण्याचा धोका निर्माण होतो.

व्हिटॅमिन सी-

व्हिटॅमिन सी हे एक कोलॅजन बूस्टर म्हणून पाहिले जाते. म्हणजेच व्हिटॅमिन सी शरीरात कोलॅजनचे उत्पादन वाढवते. कोलॅजनच्या कमतरतेमुळे केसांची मुळे कमकुवत होतात. म्हणून, जेव्हा शरीरात व्हिटॅमिन सीची कमतरता असते तेव्हा केस गळू लागतात.

व्हिटॅमिन ए-

केस गळतीचे कारण व्हिटॅमिन ए ची कमतरता देखील असू शकते.  कारण व्हिटॅमिन ए केसांना मजबूत करण्याचे काम करते. व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे केस गळू लागतात.

लोह-

केसांच्या वाढीसाठी आणि मजबूतीसाठी, जीवनसत्त्वांसह खनिजे देखील आवश्यक असतात. लोहाच्या कमतरतेमुळे केसांची रचना कमकुवत होऊ शकते.केसांची वाढ खुंटू शकते आणि केस गळणे किंवा टक्कल पडणे वाढू शकते.

 

(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)


About Author

Aiman Jahangir Desai

Other Latest News