Whatsapp New Features : जगभरात इन्स्टंट मेसेजिंगसाठी सर्वाधिक वापरले जाणारे अॅप म्हणजे व्हॉट्सअॅप. सुमारे ३.५ अब्जांहून अधिक लोक आपल्या मोबाईलमध्ये वॉट्सअॅप वापरतात. आपल्या कोट्यवधी युजर्सच्या सोयीसाठी Meta कंपनीकडून या अॅपमध्ये सतत नवे फीचर्स दिले जातात. वॉट्सअॅप युजर्सना “स्टेटस” चा फीचर उपलब्ध आहे आणि आता कंपनीने त्यामध्ये मोठा बदल केला आहे.
व्हॉट्सअॅपने स्टेटससाठी ४ नवे फीचर्स लाँच केले
गेल्या काही काळात व्हॉट्सअॅपने स्टेटस फीचरमध्ये अनेक मोठे अपडेट्स दिले आहेत. काही काळापूर्वीच कंपनीने स्टेटसमध्ये कॉन्टॅक्ट मेंशन आणि म्युझिक शेअरिंग ची सुविधा दिली होती. जर तुम्हीही नियमितपणे स्टेटस टाकत असाल, तर तुमचा अनुभव आता पूर्णपणे बदलणार आहे. व्हॉट्सअॅपने स्टेटस कस्टमायझेशनसाठी ४ नवीन फीचर्स सादर केले आहेत.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये युजर्सना माहिती दिली आहे, की ते स्टेटस सेक्शनसाठी ४ नवे फीचर्स जोडत आहे. या नव्या फीचर्सच्या मदतीने युजर्सना स्वतःला पूर्वीपेक्षा अधिक प्रभावीपणे व्यक्त करता येणार आहे. व्हॉट्सअॅपमधील हे फीचर्स युजर्सना एक नविन अनुभव देणार आहेत. वॉट्सअॅपच्या ब्लॉगनुसार हे फीचर्स लवकरच येणाऱ्या अपडेट्समध्ये समाविष्ट केले जातील.
वॉट्सअॅपचे ४ नवे फीचर्स
- Layout फीचर:
व्हॉट्सअॅप स्टेटससाठी युजर्सना लेआउट फीचर मिळणार आहे, ज्याच्या मदतीने ६ फोटो एकत्र करून कोलाज तयार करता येईल. यामध्ये एडिटिंग टूल्सद्वारे फोटो व्यवस्थितपणे मॅनेज करता येतील. - म्युझिक स्टिकर:
युजर्स आता स्टेटसवर आपला आवडते गाणेही जोडू शकतात आणि त्याला सहजपणे म्युझिक स्टिकरमध्ये बदलू शकतात. - फोटो टू स्टीकर:
कोणतीही फोटो आता स्टीकरमध्ये कन्व्हर्ट करून स्टेटसवर लावता येणार आहे. याला योग्य आकार देण्यासाठी एडिटही करता येणार आहे. - Add Yours Stickers:
फोटो सिलेक्ट करून तुम्ही आता Add Yours स्टिकरच्या मदतीने मित्रांना संवादात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करू शकता. मित्र यावर उत्तर देतील, तर ते आपल्याही स्टेटसवर ते शेअर करू शकतील.