दिवसभराच्या थकव्यानंतरही अनेकांना रात्री लवकर झोप येत नाही. रात्री व्यवस्थित झोप आली नाही तर दिवसभर फ्रेश वाटत नाही. रात्री झोप नाही आली तर थकवा येतो, कोणत्याही कामात उत्साह जाणवत नाही. झोप हा रोजचा महत्वाचा दिनक्रम. रात्रीची झोप झाली नाही तर पुढचा पुर्ण दिवसभर आळस जाणवतो. शांत झोपण्यासाठी काही उपाय केले जाऊ शकतात. तर मग ह्या टीप्स रात्रीच्या शांत झोपेसाठी उपयोगी ठरतील.
दुधाचे सेवन करा
झोपण्याआधी एक ग्लास कोमट दूध घेतल्याने शांत झोप लागते. कोमट दूध प्यायल्याने मेंदूला आराम मिळतो आणि चांगली झोपही येते. ज्यांना जास्त थकव्यामुळे झोप येत नाही त्यांनी अर्धा चमचा मध कोमट दुधात मिसळून प्यावे. मधाचे दूध प्यायल्याने झोप न येण्याची समस्या दूर होते.

तळपायाला तेल लावणे
पायाच्या तळव्यावर झोपण्यापूर्वी मोहरीचे तेल लावल्याने ही शांत झोप लागण्यास मदत होते.
झोपण्यापूर्वी फ्रेश होणे
दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी चेहरा,हात,पाय स्वच्छ धुणे यामुळे शांत झोप लागते. गरम पाण्याने अंघोळ केल्यास सुद्धा झोप शांत लागते.
फोन दूर ठेवा
बरेच लोक झोपतानाही फोन वापरतात, तुम्हाला हे करण्याची गरज नाही. झोपण्याच्या अर्धा तास आधी फोनपासून दूर राहावे. अशा स्थितीत शांत मनाने काही मिनिटांतच तुम्ही शांतपणे झोपू शकाल.
इतर गोष्टींचा विचार करू नका
अनेक वेळा आपण इतर गोष्टींचा विचार करू लागतो. तुम्हीही हे करत असाल तर आतापासून तुमची ही सवय बदला. असे केल्याने तुम्हाला झोपेचा त्रास होईल. जर तुम्हाला लगेच झोपायचे असेल तर तुमचे मन शांत ठेवा.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)