कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात नक्की खा ‘या’ भाज्या

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आजच आहारात करा 'या' भाज्यांचा समावेश..

शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत आपण कमी कोलेस्ट्रॉलयुक्त पदार्थांचे सेवन केले पाहिजे, जेणेकरून शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते. चला जाणून घेऊया असे कोणते पदार्थ आहेत जे शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित करतात.

दुधी भोपळा

दुधीमध्ये भरपूर पाणी आणि फायबर असते, जे पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. त्यामुळे पोट साफ होते आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासून आराम मिळतो आणि कोलेस्ट्रॉलची पातळीही नियंत्रणात राहते. दुधीमध्ये नियमित सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होतेच पण हृदयविकाराचा धोकाही कमी होतो. शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास देखील हे उपयुक्त आहे.

गाजर

गाजरात आढळणारे बायोएक्टिव्ह संयुगे आणि विरघळणारे फायबर शरीरातील कोलेस्ट्रॉलचे शोषण कमी करून उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या दूर करतात.

ब्रोकोली

ब्रोकोलीमध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात आढळतात जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात.

लसूण

लसणात ॲलिसिन नावाचे संयुग आढळते जे कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करते.

सोयाबीन

टोफू आणि सोया मिल्क यांसारखे सोयाबीन आणि त्यापासून बनवलेले पदार्थ कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात.

बीट

फायबरयुक्त बीटाचा आहारात समावेश केल्यास रक्तदाब तसेच कोलेस्ट्रॉल दोन्हीही नियंत्रणात राहू शकते.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News