दिवसाच्या तुलनेत रात्री ट्रेनचा वेग जास्त का असतो? जाणून घ्या कारण

रेल्वेने दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. पण दिवसाच्या तुलनेत रात्रीच्या वेळी गाड्या इतक्या वेगाने का धावतात याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? यामागचं रंजक का जाणून घ्या...रण

दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. काही लोक स्लीपर, एसीमध्ये प्रवास करतात तर काही लोक सामान्य डब्यातून प्रवास करतात पण दिवसाच्या तुलनेत रात्रीच्या वेळी गाड्या इतक्या वेगाने का धावतात याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? किंवा तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की कधीकधी एकाच ट्रेनला दोन इंजिन का जोडलेले असतात? तर आज याबद्दल सविस्तर माहिती घेऊया…

रात्री ट्रेन दिवसापेक्षा जास्त वेगाने का धावतात? 

रात्री ट्रेन दिवसापेक्षा जास्त वेगाने का धावतात? याचे मुख्य कारण म्हणजे रात्रीच्या वेळी रेल्वे पटऱ्यांवर आणि आसपासच्या परिसरामध्ये कमी गर्दी आणि मेंटेनन्सचे काम असते, ज्यामुळे ट्रेनला अधिक वेगाने धावण्यासाठी मोकळी जागा मिळते. रात्रीच्या वेळी पटऱ्यांवर आणि आसपासच्या परिसरामध्ये लोक, प्राणी आणि इतर वाहनांची कमी हालचाल असते, ज्यामुळे सुरक्षा आणि वेग वाढवण्यास मदत होते. रात्रीच्या वेळी पटऱ्यांवर मेंटेनन्सचे काम कमी प्रमाणात केले जाते, ज्यामुळे ट्रेनला अडथळ्या बिना धावण्यासाठी अधिक वेळ मिळतो. रात्रीच्या वेळी सिग्नल स्पष्टपणे दिसतात, ज्यामुळे ड्रायव्हरला ट्रेनचा वेग वाढवायला मदत होते. या सर्व कारणांमुळे रात्रीच्या वेळी ट्रेन दिवसापेक्षा जास्त वेगाने धावतात.

दिवसा वाहतुकीचा ताण

दिवसा रेल्वे रुळांवर खूप गर्दी असते. दिवसा एक्सप्रेस गाड्या, प्रवासी गाड्या, मालवाहतूक गाड्या जास्त वेळा धावतात. तसेच या गर्दीमुळे, गाड्यांना सिग्नलवर वारंवार थांबावे लागते आणि त्यांचा वेग कमी होतो. सुरळीत वाहतूक व्यवस्थापनासाठी, गाड्यांना अनेक ठिकाणी क्रॉस करावे लागते, ज्यामुळे त्यांच्या वेगावर परिणाम होतो.

एकाच ट्रेनला दोन इंजिन का जोडलेले असतात?

जेव्हा एखादी ट्रेन खूप जड किंवा खूप लांब असते, तेव्हा एकच इंजिन जास्त वेगाने ट्रेन चालवण्यासाठी पुरेशी शक्ती प्रदान करत नाही. म्हणून एकाच ट्रेनमध्ये दोन इंजिन बसवले जातात, ज्यामुळे ट्रेनला पुरेशी शक्ती मिळते. ट्रेनमध्ये एका इंजिनमध्ये बिघाड झाल्यास, दुसरे इंजिन ट्रेन चालविण्यास मदत करू शकते. 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News