Constipation Tips: तासंतास बसूनही शौचास साफ होत नाही? ‘या’ उपायाने लगेच मिळेल आराम

Constipation Tips: तासंतास बसूनही शौचास साफ होत नाही? 'हा' आयुर्वेदिक उपाय ठरेल फायदेशीर

Ayurvedic method to relieve constipation: बद्धकोष्ठता ही एक सामान्य समस्या आहे. जी पचनसंस्थेच्या मंद हालचालीमुळे होते. ही समस्या प्रामुख्याने जीवनशैली, चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि पाण्याच्या कमतरतेमुळे उद्भवते. बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी लोक अनेकदा विविध घरगुती उपायांचा अवलंब करतात. एक प्रभावी आणि पारंपारिक उपाय म्हणजे दूध आणि तूप मिसळून सेवन करणे. हा एक सोपा, नैसर्गिक आणि प्रभावी उपाय आहे. जो आपल्या देशात अनेक वर्षांपासून वापरला जात आहे आणि तो आजही तितकाच प्रभावी आहे. आयुर्वेदिक तज्ञ म्हणतात की, जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल आणि नैसर्गिक उपाय हवा असेल तर दररोज दूध आणि तुपाचे हे मिश्रण अवश्य प्या. हे मिश्रण केवळ पचनसंस्था सुधारत नाही तर आतड्यांची हालचाल देखील सुधारते. चला तर मग पाहूया या मिश्रणाचे फायदे आणि हे मिश्रण पिण्याची योग्य वेळ…

बद्धकोष्ठतेसाठी दूध आणि तुपाचे मिश्रण-

हे मिश्रण बनवण्यासाठी सर्वप्रथम, ताजे दूध घ्या आणि ते चांगले उकळवा. यानंतर, १ कप कोमट दूध घ्या आणि त्यात १ चमचा शुद्ध तूप घाला. ते चांगले मिसळा आणि कोमट झाल्यावर हळूहळू प्या. पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी ही रेसिपी खूपच प्रभावी आहे.

पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत-

दूध आणि तूप यांचे मिश्रण पचनसंस्थेला आराम देते. दुधामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते, जे आतड्यांचे कार्य सुधारते. तुपामध्ये असलेले फॅटी अ‍ॅसिड आतड्यांची हालचाल वाढवतात, ज्यामुळे मल सहज बाहेर पडण्यास मदत होते. याचे नियमित सेवन केल्याने अधिक फायदे मिळतात.

पोटाच्या अंतर्गत समस्यांमध्ये फायदेशीर-

जर आतड्यांमध्ये सूज, जळजळ किंवा गॅसची समस्या असेल तर दूध आणि तुपाचे मिश्रण ते शांत करण्यास मदत करते. तुपामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे आतड्यांतील जळजळ कमी करतात, तर दूध पचनसंस्थेला शांत करते. हे मिश्रण पचन सुधारते आणि आतडे निरोगी ठेवण्यास मदत करते.

पिण्याची योग्य वेळ-

सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी दुध आणि तुपाचे हे मिश्रण पिणे सर्वात फायदेशीर आहे. झोपण्यापूर्वी ते प्यायल्याने ते रात्रभर शरीरात काम करते, आतड्यांना आराम देते आणि दुसऱ्या दिवशी शौचास त्रास होत नाही. याशिवाय, ते शरीराला शांत करण्यास आणि झोप सुधारण्यास मदत करते. ज्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या देखील कमी होते.

About Author

Aiman Jahangir Desai

Other Latest News