Reasons for early menstruation: महिलांच्या आयुष्यात किशोरावस्थेपासून ते गर्भधारणेपर्यंत, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या बरेच काही घडते. मासिक पाळी देखील या प्रक्रियांचा एक महत्वाचा भाग आहे. काही महिलांना तीन दिवस मासिक पाळी येते, तर काहींना सात दिवस. प्रत्येक महिलेच्या शरीराच्या रचनेनुसार हे चक्र बदलत राहते. काही महिलांना अनियमित मासिक पाळी येते. तर काहींना लवकर मासिक पाळी येण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. आज आपण मासिक पाळी ठराविक वेळेपेक्षा लवकर येण्याची काही कारणे जाणून घेणार आहोत.
जास्त व्यायाम-
जिममध्ये व्यायाम केल्याने तुमच्या शरीराला फायदा होतो. पण, प्रत्येक गोष्टीत संतुलन आवश्यक आहे. खूप जास्त प्रमाणात व्यायाम केल्याने तुमची मासिक पाळी थांबू शकते. ही स्थिती खेळाडूंमध्ये सर्वात जास्त दिसून येते. फक्त मासिक पाळी थांबतच नाही तरी त्यामुळे मासिक पाळी लवकरसुद्धा येते. योग्य उर्जेशिवाय, तुमचे शरीर सामान्यपणे ओव्हुलेशन करण्यासाठी पुरेसे हार्मोन्स तयार करू शकणार नाही.

ताण-
तुमच्या ताणतणावाची पातळी तुमच्या हार्मोन्सवर प्रतिकूल परिणाम करू शकते. ज्यामुळे मासिक पाळी अनियमित होऊ शकते. कारण काहीही असो, तणावातून मुक्त होण्याचे मार्ग शोधा. ज्यामुळे मासिक पाळी नियमित आणि ठराविक वेळेत होईल.
प्रिमोनोपॉज-
हा रजोनिवृत्तीपूर्वीचा काळ आहे. हे सहसा चाळीशीच्या दशकाच्या मध्यात किंवा नंतर सुरू होते. बहुतेक प्रकरणांमध्ये हे चार वर्षे टिकते. या काळात, हार्मोन्सच्या पातळीत मोठे चढउतार दिसून येतात. ज्यामुळे दरमहा ओव्हुलेशन होऊ शकत नाही. यामुळे, मासिक पाळी अनियमित होऊ शकते किंवा ती १८ दिवसांनी किंवा २१ दिवसांनी येऊ शकते.
थायरॉईड-
असे म्हटले जाते की, आठपैकी एका महिलेला तिच्या आयुष्यात थायरॉईडची समस्या असते. जेव्हा थायरॉईड ग्रंथी योग्यरित्या कार्य करत नाहीत, तेव्हा तुमची पचनक्रिया आणि मासिक पाळी नियंत्रणाबाहेर जाते. बहुतेक प्रकरणांमध्ये, मासिक पाळी सामान्यपेक्षा खूपच कमी असते आणि लवकर येते. अनपेक्षित वजन वाढणे किंवा कमी होणे हे देखील याचे एक कारण आहे.
हार्मोनल बर्थ कंट्रोल-
गर्भनिरोधक गोळ्यांमधील हार्मोन्सचा थेट परिणाम ओव्हुलेशन आणि तुमच्या मासिक पाळीवर होतो. जर तुम्ही नियमितपणे गर्भनिरोधक गोळ्या घेत असाल, तर तुमच्या पुढील मासिक पाळीची वेळ तुमच्या चक्रादरम्यान तुम्ही गोळ्या कधी घेण्यास सुरुवात केली यावर अवलंबून असेल.
वजनातील चढउतार-
बहुतेक प्रकरणांमध्ये, स्त्रियांच्या मासिक पाळीतील कोणतेही बदल तुमच्या वजनाशी संबंधित असतात. वजन वेगाने कमी होणे किंवा वाढणे याचा तुमच्या हार्मोन्सवर परिणाम होऊ शकतो. जेव्हा असे होते तेव्हा तुमच्या मासिक पाळीवर परिणाम होतो. ज्यामुळे तुम्हाला वेळेपूर्वी मासिक पाळी येऊ शकते. किंवा वेळेआधीसुद्धा मासिक पाळी येऊ शकते.
(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)