इअरबड्सने कान स्वच्छ करण्याची सवय महागात पडू शकते, जाणून घ्या परिणाम…

कानातला मळ काढण्यासाठी आणि कान स्वच्छ करण्यासाठी बहुतांश लोक इअरबडचा वापर करतात. तुम्हीही इअरबड वापरत असाल तर त्यामुळे काय नुकसान होते हे जाणून घ्या.

कान हा मानवी शरीराचा सर्वात संवेदनशील भाग मानला जातो. त्याबाबत थोडीशी निष्काळजीपणा तुम्हाला महागात पडू शकतो. अनेकदा लोक कानात थोडीशी खाज किंवा घाण जाणवल्यावर इअर बड्सने कान स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतात. पण तुम्हाला माहिती आहे का की तुमची ही सवय तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. इतकेच नाही तर असे केल्याने कानाच्या आत अनेक गंभीर जखमा निर्माण होऊ शकतात आणि व्यक्तीला कानाशी संबंधित आजार होण्याचा धोका देखील वाढतो.

कानाच्या पडद्याचे होऊ शकते नुकसान

इअरबड्समुळे कानाच्या पडद्याला नुकसान होऊ शकते. हे नुकसान श्रवणशक्ती कमी होण्यासारखे गंभीर परिणाम करू शकते. इअरबड्समधील कापूस मऊ असतो, परंतु त्याचा सतत वापर केल्याने कानाच्या नसांना खूप नुकसान होऊ शकते. कानाचा पडदा खूप संवेदनशील असतो. जर कापसापासून बनवलेला इअरबड वारंवार त्यावर आदळला तर कानाच्या पडद्याला नुकसान होऊ शकते. 

कानात मळ साठू शकतो

इअरबड्स वापरल्याने कानात मळ साठण्याची शक्यता असते. इअरबड्समुळे हा मळ कानातून बाहेर पडण्याऐवजी आतमध्ये ढकलला जातो. इअरबड्स वापरल्याने कानात मळ आणखी आत ढकलू शकतात, ज्यामुळे घाण बाहेर पडत नाही परंतु आत साचून राहते. ज्यामुळे संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता जास्त असते. इअरबडने कान साफ केल्यास मळ आतमध्ये ढकलला जातो, ज्यामुळे कान बंद होऊ शकतो, ज्यामुळे वेदना आणि संक्रमण होऊ शकते. 

कानातून येऊ शकतो पू

जेव्हा तुम्ही कान स्वच्छ करण्यासाठी इअरबड वापरता, त्यावनेळी कानात वेदना होऊ शकतात तसेच काही दुखापत झाल्यास कानात पू होण्याची समस्या देखील होऊ शकते. खरंतर, चुकीच्या पद्धतीने इअरबड्स वापरणे हे कानासाठी खूप हानिकारक असू शकते, ज्यामुळे तुमच्या कानातून रक्तस्त्राव देखील होऊ शकतो.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News