रायगडावर 352 वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा, 2 ते 3 लाख शिवभक्त रायगडावर उपस्थित 

राज्यातील कानाकोपऱ्यातून दोन ते तीन लाख शिवभक्त रायगडवरती दाखल झालेत. पारंपारिक वेशभूषेत. लेझीम, ढोल-ताशाच्या गजरात इथे मिरवणूक आणि पालखीची मिरवणूक काढण्यात येणार आहे.

Shivarajyabhishek – हिंदू स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज 352 वा शिवराज्याभिषेक आहे. हा शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर मोठ्या उत्साहात होत आहे. या सोहळ्यासाठी राज्यातील विविध भागातून रायडावर शिवभक्तांनी हजेरी लावली आहे. मागील काही दिवसांपासून दुर्गराज किल्ले रायगडवर या सोहळ्याचे जय्यत तयारी करण्यात येत होती. त्यामुळे आज दुर्गराज किल्ले रायगडवर पारंपारिक वेशभूषेत शिवभक्त दाखल झाले असून, शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा होत आहे.

२ ते ३ लाख शिवभक्त रायगडावर दाखल

दरम्यान, आज किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा 352 राज्याभिषेक सोहळा पार पडत असताना, यानिमित्त राज्यातील विविध भागातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर विविध कार्यक्रम पार पडत आहेत. तसेच राज्यातील कानाकोपऱ्यातून दोन ते तीन लाख शिवभक्त रायगडवरती दाखल झालेत. पारंपारिक वेशभूषेत. लेझीम, ढोल-ताशाच्या गजरात इथे मिरवणूक आणि पालखीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत स्थानिक पोलीस प्रशासन आणि अधिकारी ही सहभागी होणार आहेत. तसेच गेल्या काही दिवसांपासून या सोहळ्याची तयारी करण्यात येत होती. आणि आता इथे मुख्य विधिवत पूजा आणि धार्मिक विधी पार पडणार आहे.

छत्रपती संभाजीराजे मिरवणुकीत सहभागी होणार

दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज आणि कोल्हापूर गादीचे वारसदार छत्रपती संभाजी महाराज हे मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी आणि मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यामुळे किल्ले रायगड आणि परिसरात सध्या शिवमय झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय… जय शिवराय… जय शिवाजी…जय भवानी… अशा घोषणानी परिसर दुमदुमून गेला आहे. तर येथे मराठा नेते म्हणून जरांगे-पाटील हे किल्ले रायगडवरती येणार आहेत. त्यामुळे येथे पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची 352 शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडत आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News