Lasun Chutney Recipe: भारतीय घरांमध्ये प्रत्येक स्वयंपाकात लसूण मोठ्या प्रमाणात वापरले जाते. लसणामुळे जेवणाला चव येते. तर दुसरीकडे लसणाची चटणीसुद्धा बनवली जाते. लसणाची चटणी तोंडाची चव वाढवते. एखाद्या वेळी भाजी नसेल तरी लसणाच्या चटणीमुळे जेवण रुचकर होते. अशावेळी अनेक महिलांना लसणाच्या चटणीची रेसिपी हवी असते. त्यामुळेच आज आपण पारंपरिक पद्धतीने लसणाची चटणी कशी बनवायची हे जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहूया लसणाच्या चटणीची सोपी रेसिपी…
साहित्य-
-लसूण १०-१२ पाकळ्या
४-५ सुक्या लाल मिरच्या
-१ कांदा चिरून
-१ मोठा टोमॅटो चिरून
-४ टेबलस्पून मोहरीचे तेल
-१ टेबलस्पून मोहरी
-१ टेबलस्पून उडदाची डाळ
-४-५ कढीपत्ता
-१ टीस्पून लाल तिखट
-१ तुकडा चिंच
-चवीनुसार मीठ

रेसिपी-
स्टेप १-
सर्वप्रथम घेतलेले सर्व साहित्य एकत्र करा. आता एका कढईमध्ये तेल गरम करा. नंतर लसूण घाला आणि हलके परतून घ्या.
स्टेप २-
नंतर त्यात कांदा, लाल सुक्या मिरच्या आणि टोमॅटो घाला आणि थोडे परतून घ्या.
स्टेप ३-
नंतर मीठ घाला आणि थोडे परतून घ्या. यामध्ये चिंचही घाला. टोमॅटो मऊ झाले की गॅस बंद करा आणि मिश्रण थंड होऊ द्या.
स्टेप ४-
आता मिश्रण थंड झाल्यावर ते मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
स्टेप ५-
त्याच कढईमध्ये उरलेले तेल घाला आणि ते गरम करा. नंतर मोहरी, कढीपत्ता आणि उडीद डाळ घाला आणि त्यांना तडतडू द्या, नंतर वाटलेली पेस्ट घाला आणि परतून घ्या.
स्टेप ६-
आता यामध्ये लाल तिखट घालून मिक्स करा. नंतर गॅस बंद करा आणि थंड झाल्यावर ते एका बरणीत भरून ठेवा.