Health Tips : तुम्हालाही सतत थकवा जाणवतो का? असू शकतात हि कारणे जाणून घ्या …

तुम्हाला सतत थकवा जाणवतो का? जाणून घ्या यामगाचं कारण...

आपले आरोग्य चांगले रहावे यासाठी प्रत्येक व्यक्तीने कमीत कमी 7 ते 8 तासांची झोप घेतली पाहिजे असा सल्ला तज्ज्ञ देतात.
पण पुरेशी झोप घेतल्यानंतरही जर तुम्हाला संपूर्ण दिवस झोप येत असेल तर हे एखाद्या आजाराचे लक्षण असू शकते. हे नक्की काय आहे ते जाणून घेऊया..

दिवसभर काम आणि तणावाला सामोरे गेल्यानंतर थकवा जाणवणे स्वाभाविक आहे. यावर मात करण्यासाठी रात्रीची शांत झोप घेणं खूप गरजेचं आहे, पण जर तुम्ही अशा लोकांपैकी असाल जे रात्री पूर्ण झोप घेऊनही दिवसभर जांभई घेतात, थकवा जाणवतो, कोणतेही काम करावेसे वाटत नाही, ज्यामुळे तुमच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होऊ लागतो. त्याचबरोबर दिवसभर झोप येणे, स्नायू आणि सांधेदुखी- दीर्घकाळ खोकला येणे सतत थंडी वाजणे, जास्त घाम येणे ,खराब मूड डोळ्यांची जळजळ आणि कोरडेपणा, कामातील रस कमी होणे ,भूक न लागणे ही अपुऱ्या झोपेमुळे होणाऱ्या आजाराची लक्षणे असू शकतात.

थकवा आणि सुस्ती का येते ?

खूप शारीरिक श्रम किंवा मेहनत केल्यानंतर एखाद्या व्यक्तीला थकवा येऊ शकतो. असा स्थितीत त्या व्यक्तीच्या अंगात उर्जा किंवा ताकद नसते. ती व्यक्ती एखादे काम नीट करू शकत नाही. तर कधी त्या व्यक्तीला वेदनाही जाणवू शकतात. झोप पूर्ण झाली नाही किंवा ताप आला असेल तर अशी परिस्थिती (थकवा व सुस्ती) उद्भवू शकते.

मधुमेह 

मधुमेहामध्ये रुग्णांना बऱ्याचा वेळा सुस्ती वाटते. त्यांना भूक व तहान जास्त लागते, वारंवार लघवीला जावे लागते आणि त्यांचे वजन झपाट्याने कमी होते. जर तुम्हालाही हा त्रास जाणवत असेल तर वेळीच डॉक्टरांना दाखवून योग्य औषधोपचार करावेत. तसेच योग्य आहार घ्यावा आणि थोडाफार व्यायाम, अथवा शारीरिक हालचाली कराव्यात. त्याशिवाय वजनावर नियंत्रण ठेवणे, व्यायाम करणे, रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे, आणि वेळेवर व नियमितपणे औषधे घेणे, या गोष्टी कटाक्षाने कराव्यात.

रक्ताची कमतरता

रक्ताच्या कमतरतेमुळे शरीरातील अनेक भागांवर व कार्यावर परिणाम होतो. व आपल्याला थकवा व अशक्तपणा जाणवतो. या समस्येने पीडित असलेल्या व्यक्तीला चक्कर येणे, थंडी वाजणे असा त्रास होऊ शकतो. ॲनिमिया झाला आहे की नाही याची खात्री करण्यासाठी रक्ताची तपासणी करुन घ्यावी लागेल. लोहाच्या कमतरतेमुळे थकवा जाणवत असल्यास आहारात आयर्न सप्लीमेंट्सचा समावेश करावा. तसेच रोजच्या आहारात पालक, ब्रोकोली आणि रेड मीटचा समावेश करावा.

ताणतणाव

कामाच्या ठिकाणी किंवा घरातही काही वेळ तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करा. गाणी ऐकणं, चित्र कारणं, फिरणे काहीही जे तुम्हाला आवडतं ते. ज्यामुळे तुम्हाला आलेला ताण कमी होईल. किंवा कामाच्या टेन्शनपासून काही वेळ स्वत:ला लांब ठेवा त्यामुळे तुमचा मूड फेश होईल आणि अधिक जोमानं काम करू शकाल.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News