उन्हाळ्यात मातीच्या मडक्यातील पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे…

मातीच्या माठातून पाणी प्यायल्याने होतात 'हे' आरोग्यदायी फायदे!

कडाक्याच्या उन्हात जेव्हा तहान लागते तेव्हा आपण फ्रीज उघडतो आणि गारेगार पाणी पितो. त्या वेळी ते गार पाणी आपल्याला खूप दिलासादायक वाटतं; पण हे पाणी आपल्या शरीरासाठी किती घातक आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? अशा वेळी या फ्रीजच्या पाण्याऐवजी तुम्ही माठातलं पाणी प्यायलात तर याचा तुम्हाला निश्चितच खूप उपयोग होईल.

आयुर्वेदातही माठातून पाणी पिण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. माठातील थंडगार पाणी पिऊन तुम्ही तहान भागऊ शकता. आयुर्वेदात मातीच्या भांड्यात पाणी पिणे, अन्न शिजवणे चांगले मानले जाते. माठातील पाणी प्यायल्याने उच्च रक्तदाबाची समस्या नियंत्रणात येते. माती ही सर्वात शुद्ध आणि रोग दूर करणारी आहे. त्यामुळं माठातील पाणी पिणे तुम्हाला निरोगी ठेवते.

चला जाणून घेऊया मातीच्या मडक्यातील पाणी पिण्याचे खास फायदे…

त्वचेचे विकार

माठात रात्रभर पाणी ठेवून सकाळी प्यायल्यामुळं त्वचेसंबंधित सर्व समस्या दूर होतात.

घश्याला आराम

माठातील पाणी प्यायल्याने तुम्हाला टॉन्सिल्स, सर्दी यासारख्या समस्या निर्माण होणार नाहीत. माठातील पाणी प्यायल्याने गळ्याला आराम मिळतो.

रक्तदाब नियंत्रणात राहतो

माठात रात्रभर भरुन ठेवलेले पाणी सकाळी प्यायल्यास उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो. रात्री माठात पाणी भरुन ठेवा त्यानंतर सकाळी उठल्यानंतर अनोशेपोटी हे पाणी प्या. माठातील पाणी जास्तीत जास्त 4 ते 5 वेळा प्या. पण एक गोष्ट लक्षात घ्या, रात्रभर पाणी माठात ठेवून द्या तरच पाण्यात विविध पोषक तत्वे मिळतील.

अ‍ॅसिडिटीसाठी फायदेशीर

माठातील पाणी प्यायल्यामुळे आपल्या शरीरातील पीएच संतुलित राहण्यास मदत होते. ज्यामुळे गॅस आणि अ‍ॅसिडिटीशी संबंधित समस्या दूर होतात.

(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News