फोनमध्ये करा या किरकोळ सेटिंग्ज, जिओ, एअरटेल, Vi चे 5G इंटरनेट चालेल सुपरफास्ट!

Vodafone Idea ने अलीकडेच आपल्या 5G सेवा देशातील अनेक शहरांमध्ये सुरू केली आहे. देशातील तिसऱ्या क्रमांकाची टेलिकॉम कंपनी दिल्ली, मुंबई, चंदीगड आणि पटणा नंतर बेंगळुरूमध्येही आपली 5G सेवा घेऊन आली आहे. 2022 मध्ये वोडाफोन-आयडियाने जिओ आणि एअरटेलसह 5G स्पेक्ट्रम लिलावात भाग घेतला होता. मात्र, AGR थकबाकीसारख्या अडचणींमुळे कंपनीला आपली 5G सेवा वेळेवर सुरू करता आली नाही. आता या 5 शहरांमध्ये यूजर्सना वोडाफोन-आयडियाची 5G सेवा मिळू लागली आहे. दुसरीकडे, जिओ आणि एअरटेलने देशातील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये आपले 5G नेटवर्क पोहोचवले आहे.

जर तुमच्याही फोनमध्ये 5G इंटरनेट चालत नसेल, घाबरू नका

जर तुम्ही जिओ, एअरटेल किंवा वोडाफोन यूजर असाल आणि तुमच्या फोनमध्ये 5G चालत नसेल, तर चिंता करण्याची गरज नाही. फोनमध्ये काही बेसिक सेटिंग्ज केल्यास 5G नेटवर्क मिळू लागेल. 5G मध्ये यूजर्सना 4G च्या तुलनेत 10 पट वेगाने इंटरनेटचा लाभ मिळतो. जिओ आणि एअरटेलच्या 5G नेटवर्कवर यूजर्सना 200 Mbps पेक्षा जास्त स्पीड मिळत आहे.

5G सुरू करण्यासाठी सर्वप्रथम हे तपासा:

1. तुमचा फोन 5G सक्षम आहे का?

सर्वप्रथम, तपासा की तुम्ही 5G इनेबल्ड स्मार्टफोन वापरत आहात का. जर तुमचा फोन 5G सपोर्ट करत असेल, तर त्यावर सहज 5G नेटवर्क चालू होईल.

2. सॉफ्टवेअर अपडेट करा

जर 5G फोन असूनही त्यात फक्त 4G सिग्नल येत असतील, तर फोनचे सॉफ्टवेअर अपडेट करा.
Settings > Software Update > Download & Install या क्रमाने जाऊन अपडेट करा. यामुळे नेटवर्क कनेक्टिव्हिटीची अडचण दूर होईल.

5G सुरू करण्यासाठी मोबाईल सेटिंग्ज

1. मोबाईल नेटवर्क सेट करा

Settings > Mobile Network > Preferred Network Type मध्ये जा आणि 5G/4G/3G/2G हे पर्याय निवडा. बऱ्याच 5G स्मार्टफोन्समध्ये 5G हे बाय डिफॉल्ट सेट केलेले असते.

2. 5G कव्हरेज तपासा

जर वरील सेटिंग्जनंतरही नेटवर्क येत नसेल, तर तुमच्या परिसरात 5G कव्हरेज आहे का हे तपासा.
टेलिकॉम ऑपरेटरच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन हे चेक करता येते. किंवा Customer Care ला कॉल करून सुद्धा माहिती मिळवू शकता.

महत्त्वाचे

4G सिम वापरणारे यूजर्स 5G चालवण्यासाठी नवीन सिम घेण्याची गरज नाही.


About Author

Jitendra bhatavdekar

Other Latest News