How to use earthenware: उन्हाळ्यात, लोक थंड पाणी पिण्यासाठी फ्रिजमधील जमा केलेल्या बर्फाच्या तुकड्यांची मदत घेतात. उन्हाळ्यात थंड पाणी तहान भागवण्यास मदत करते. पण त्याच वेळी खोकला आणि सर्दी होण्याचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत, तहान भागवण्यासोबतच, मातीच्या भांड्यातील थंड पाणी थकवा दूर करण्यासदेखील मदत करते. आयुर्वेदात मातीच्या भांड्यातील पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे. पण त्याआधी, मातीचे नवे भांडे पाणी भरण्यापूर्वी ते व्यवस्थित कसे स्वच्छ करायचे ते जाणून घेणे आवश्यक आहे. त्यामुळेच आज आपण मातीचे भांडे स्वच्छ करण्याच्या टिप्स आणि त्याचे शरीराला होणारे फायदे जाणून घेणार आहोत.
फ्रिजपेक्षा माठाचे पाणी का खास आहे?
तज्ज्ञ सांगतात की, मटक्याच्या पाण्यात जास्त प्रमाणात खनिजे आढळतात. कारण त्यात मातीचे विद्युत चुंबकीय गुणधर्म आढळतात. खरं तर, हे पाणी मातीपासून येते, ज्यामुळे त्याचे स्वरूप क्षारीय बनते. हे शरीर आणि मन बरे करण्यास मदत करते. हे पूर्णपणे नैसर्गिक आणि रसायनमुक्त असते. त्यामुळे फ्रिजपेक्षा मटक्याचे पाणी जास्त फायदेशीर असते.
नवीन माठाची स्वच्छता कशी करावी?
मऊसूत कापडाने माठ घासून घ्या-
नवीन माठ साफ करण्यासाठी सर्वप्रथम, एक मऊ कापड घ्या आणि भांडे आतून घासून त्यात असलेला चिखल स्वच्छ करा. अशा प्रकारे, मडक्यात असलेले मातीचे छोटे कण काढून टाकता येतात. तसेच साफसफाईची प्रक्रिया सोपी होते.
माठ उलटे करून धुवा-
नवीन माठ एका स्टँडवर उलटे ठेवा आणि त्यावर काही वेळ पाणी घाला. यामुळे माती थंड होते आणि पाणी भरल्यानंतर बराच काळ थंड राहते. काही तास भांडे उलटे ठेवा. असे केल्याने मातीचा वासदेखील निघून जातो.
मीठ, बेकिंग सोडा आणि व्हिनेगरचे मिश्रण-
एका ग्लासमध्ये २ ते ३ चमचे मीठ, बेकिंग सोडा आणि व्हिनेगर टाका आणि ते पाण्यात विरघळवा. आता हे मिश्रण नवीन माठात घाला आणि १० ते १५ मिनिटे ठेवा. यासोबतच भांड्यात थोडे पाणी भरा. या मिश्रणाने मडके स्वच्छ करा, आता हे मिश्रण काढून टाका आणि माठ पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवा.
स्वच्छ पाणी भरून ठेवा-
माठ धुतल्यानंतर, ते वरपर्यंत मिठाच्या पाण्याने भरा आणि काही तास झाकून ठेवा. यामुळे, माठात असलेले लहान छिद्र उघडू लागतात. आता खारट पाणी ओता आणि भांडे साध्या पाण्याने धुवा आणि ते पाण्याने भरून ठेवा. यामुळे पाणी थंड राहते.
माठातील पाणी पिण्याचे फायदे-
मातीच्या भांड्यात अर्थातच माठात पाणी पिण्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. या पाण्याने शरीराला लोह, कॅल्शिअम, मॅग्नेशिअमसारखे खनिजे मिळतात. शरीर थंड राहण्यास मदत होते, शरीरातील उष्णता कमी होते.