आपल्यापैकी अनेकांना खूप खायला आवडते. असे फूडी लोक पोट भरले तरीही एखादा आवडता पदार्थ खात राहतात. जर तुम्हालाही अशा समस्यांचा सामना करावा लागत असेल, तर तुम्हाला काही खबरदारी घेण गरजेचे आहे. खरं तर, ही एक प्रकारची समस्या आहे जी थेट तुमच्या मानसिक आरोग्याशी जोडली जाऊ शकते.
वजन वाढणे

पचनसंस्थेच्या समस्या
ऊर्जा कमी होणे
आरोग्य समस्या
जास्त खाण्याची सवय आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामुळे अनेक आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. पोटात ऍसिड जास्त निर्माण होणे, छातीत जळजळ, अपचन, वजन वाढणे, आणि काही गंभीर स्थितीत तर खाण्याचे विकार देखील होऊ शकतात. जास्त खाण्याने रक्तदाब, मधुमेह आणि हृदयविकार यांसारख्या गंभीर समस्या देखील होऊ शकतात.
मानसिक आरोग्य
जास्त खाण्याची सवय मानसिक आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. या विकाराने ग्रस्त व्यक्ती जास्त प्रमाणात खाऊ शकते, पण तिला ते थांबवता येत नाही. यामुळे वजन वाढू शकते, तसेच नैराश्य आणि चिंता वाढू शकतात. ही एक गंभीर मानसिक आरोग्य समस्या आहे, ज्यामध्ये व्यक्ती जास्त प्रमाणात खाते आणि ते थांबवू शकत नाही.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)