उन्हाळ्यात घाम येणे ही खूप सामान्य गोष्ट आहे. मात्र खूप जास्त प्रमाणात घाम येत असेल तर ही वेगळी समस्या असू शकते . अनेकदा याकडे लोक फार गंभीरतेने घेत नाहीत. त्यामुळे त्यांना पुढे त्रास होऊ शकतो. अति घाम येणे हे लक्षण हायपरहाइड्रोसिसमध्ये देखील दिसून येते. यामध्ये व्यक्तीला सतत थकवा, चक्कर येणे आणि मूड बदलणे या समस्यांचा सामना करावा लागतो.
जास्त घामामुळे लोक मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होतात आणि दैनंदिन जीवनात समस्यांना सामोरे जावे लागते. अतिरिक्त घाम येण्याची समस्या त्रासदायक ठरते. यावर काळजी घेणे गरजेचे आहे. खूप घाम येण्याची अनेक कारणे असतील. अनेकदा खूप जास्त औषधे घेतल्याने, स्थुलतेमुळे, ब्लड प्रेशर कमी झाल्याने किंवा मग थॉयराईडची समस्या असल्यास खूप घाम येऊ शकतो.

घाम जास्त येण्याची कारणे :
- उन्हाळ्यातील उकाड्यामुळे किंवा कडक उन्हात जास्त फिरल्याने घाम येतो.
- जास्त काम किंवा व्यायाम करण्याने घाम भरपूर येतो.
- जास्त गरम किंवा तिखट, मसालेदार पदार्थ खाण्यामुळे घाम येऊ शकतो.
- तसेच काहीवेळा विशिष्ट औषधे, स्थूलता, रक्तातील साखर कमी झाल्याने किंवा थायरॉइडची समस्या यामुळेही अतिघाम येण्याची समस्या निर्माण होते.
- तेलकट अन्नाचे जास्त सेवन केल्याने जास्त घाम फुटतो.
घाम कमी येण्यासाठी हे करावे घरगुती उपाय :
- लिंबू – हाता-पायाच्या तळव्यांना किंवा काखेत जास्त घाम येत असल्यास अर्धा लिंबू कापून तो जास्त घाम येणाऱ्या भागावर चोळावा व त्यानंतर तीस मिनिटांनी हात पाय धुवावेत किंवा अंघोळ करावी. लिंबूमध्ये सायट्रिक ऍसिड असते त्यामुळे बॅक्टेरिया नष्ट होतात आणि घाम कमी होण्यासाठी मदत होते.
- टोमॅटो – अधिक घाम येत असल्यास टोमॅटोचा आहारात समावेश करावा, ग्लासभर टोमॅटोचा ज्यूस दररोज प्यावा. टोमॅटोमुळे घाम कमी करण्यासाठी मदत होते.
- उन्हाळ्यात भरपूर पाणी प्या. यामुळे, श्वास घेण्यास त्रास होणार नाही.
- आपल्या आहारातून तेलकट पदार्थाचा वापर टाळावा.
- उन्हाळ्यात सूती कपडे घाला जेणेकरून घाम सहज शोषू शकेल.
- लिंबूपाणी नियमितपणे प्या.
- शरीराचा ज्या भागात जास्त घाम येतो. त्या ठिकाणी बटाट्याचे तुकडे घासून घ्या.
- दररोज एक कप ग्रीन टी प्या.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)