उन्हाळ्यात तापमानात वाढ आणि शरीराच्या हायड्रेशनची गरज वाढल्याने, ताक पिणे शरीरासाठी फायदेशीर ठरते. ताक हे पचनाला मदत करणारे, शरीराला थंड ठेवणारे आणि प्रतिकारशक्ती वाढवणारे पदार्थ मानले जाते. त्यामुळे उन्हाळ्यात ताक पिणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असते. ताकामध्ये असलेले प्रोबायोटिक्स आणि कॅल्शियम पचनतंत्र सुधारतात आणि हाडांची ताकद वाढवतात. त्यासोबतच, ताक शरीराचे तापमान कमी करण्यास मदत करते आणि ऊर्जा देते. उन्हाळ्यात शरीराला हायड्रेशनची आवश्यकता असते, आणि त्यासाठी ताक एक उत्तम उपाय आहे.
हायड्रेशन
उन्हाळ्यात डिहायड्रेशनची समस्या दिसून येते. या समस्येवर मात करण्यासाठी, तुम्ही ताक सेवन केले पाहिजे. उन्हाळ्यात त्याचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर असते.

वजन नियंत्रण
वजन वाढणे ही आता एक सामान्य समस्या बनली आहे. वजन कमी करण्यासाठी, लोक सहसा कमी कॅलरीज वापरतात. जर तुम्हालाही तुमचे वजन नियंत्रित करायचे असेल तर ताक सेवन करणे प्रभावी ठरेल. उन्हाळ्याच्या दिवसात आजारांचा धोकाही वाढतो. ताक प्यायल्याने आरोग्य सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होते.
अॅसिडिटी कमी होते
बऱ्याचदा बाहेरचे जंकफूड किंवा तळलेले, मसालेदार पदार्थ खाण्यामुळे आपल्याला अॅसिडिटीचा त्रास जाणवतो. ज्यामुळे पोटदुखी, छातीत जळजळ, पोटात गॅस पकडणे असे त्रास होतात. अशावेळी, एक ग्लास ताकामध्ये काळीमिरी पावडर किंवा सुंठ पावडर मिसळून या ताकाचे सेवन करावे. यामुळे ताकातील लॅक्टिक अॅसिड आपल्या पोटातील अॅसिडिटी कमी करते. तसेच काळीमिरी पावडर आणि ताकाचा थंडावा यामुळे छातीत होणारी जळजळ कमी होते. नियमित स्वरुपात ताक प्यायल्यास गॅस, अपचन आणि पोट जड होणे यासारख्या समस्यांचा सामना करावा लागत नाही.
अन्न पचण्यास मदत होते
आपल्यापैकी अनेकांना जेवल्यानंतर ताक पिण्याची सवय असते. ताक हे आपल्या पचनसंस्थ्येसाठी वरदान असल्याचे मानले जाते. जेवणानंतर ताक पिणे ही एक चांगली सवय आहे. ताकात असणारे चांगले बॅक्टेरिया व लॅक्टिक अॅसिड हे अन्न पचविण्यासाठी तसेच मेटाबॉलिझमचा वेग सुधारण्यास उपयुक्त ठरते. यामुळेच जेवणानंतर ताक पिणे फायदेशीर ठरते.
हाडांसाठी फायदेशीर
जर तुम्हाला हाडांच्या समस्या असतील तर ताक नक्की खा. ताकामध्ये प्रथिने आणि कॅल्शियमसारखे आवश्यक पोषक घटक आढळतात. हे पोषक घटक हाडे मजबूत करतात.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)