11th Standrad Admission – दहावीचा निकाल जाहीर झालानंतर आता अकरावी प्रवेशासाठी सर्वांची धावपळ सुरू होत आहे. विद्यार्थी आणि पालक त्यासाठी कोणत्या कॉलेज चांगले आहे. कुठे चांगले शिकवले जाते. याची चौकशी करताना दिसताहेत. यंदाची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन आहे, त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांचे कष्ट काही प्रमाणात कमी होणार आहेत. सोमवार म्हणजे (19 मे) आजपासून अकरावी प्रवेशाचे ऑनलाईन नोंदणी अर्ज भरण्यास सुरूवात होणार आहे. नेमकी कशी आहे प्रक्रिया पाहूया…
संकेत स्थळावरुन प्रवेशाची माहिती
अकरावी ऑनलाईन प्रक्रियेबाबत विद्यार्थी आणि पालक यांच्या मनात प्रचंड संभ्रम आहेत. ते दूर करण्यासाठी ते समाजमाध्यमांवरील विविध माहितीच्या स्रोतांचा आधार घेतात. राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया 2025-26 शैक्षणिक वर्षापासून ऑनलाईन पद्धतीने राबविली जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला केवळ ऑनलाईन अर्ज भरूनच अकरावीला प्रवेश मिळणार आहे. अधिकृत संकेतस्थळ उपलब्ध करून देण्याच्या विचाराने शालेय शिक्षण विभागाने एका पत्रकाद्वारे या संकेतस्थळाची माहिती दिली.

8530955564 हेल्पलाईन नंबर…
दरम्यान, शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांसाठी अधिकृत संकेतस्थळ कार्यान्वित केले आहे. या संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा, आवश्यक कागदपत्रे, आणि शाळा-महाविद्यालये यांची माहिती मिळणार आहे. त्याशिवाय प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील शंका असल्यास, विद्यार्थ्यांना 8530955564 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच, विद्यार्थी आपल्या शंका ई-मेलवरही पाठवू शकतात.
कोणत्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरायचा…
दुसरीकडे शालेयशिक्षण विभागाने अधिकृत संकेतस्थळाची माहिती दिली असून या संकेतस्थळावरच अर्ज भरावेत असे आवाहन करण्यात आले आहे. आजपासून ऑनलाईन प्रवेशाचा नोंदणी अर्ज भरता येणार आहे. अकरावीचा ऑनलाईन प्रवेश अर्ज दोन भागांत विभागलेला आहे. पहिल्या भागामध्ये विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती भरावयाची आहे. दरम्यान, अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी माध्यमिक शिक्षण विभागाने https://mahafyjcadmissions.in हे संकेतस्थळ सुरु केले आहे. या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांनी भरावा असं शिक्षण विभागाने म्हटले आहे.