1 जुलैपासून बदलणार बँकांचे नियम: एचडीएफसी आणि ICICI बँकने शुल्कात केले मोठे बदल

1 जुलै 2025 पासून खासगी क्षेत्रातील दोन प्रमुख बँकांचे नियम बदलणार आहेत. एचडीएफसी बँक आणि ICICI बँक यांनी आपल्या क्रेडिट कार्ड व व्यवहारांवरील शुल्कांमध्ये महत्त्वपूर्ण बदल जाहीर केले आहेत. हे बदल सामान्य ग्राहकांवर थेट परिणाम करणार आहेत.

एचडीएफसी बँकेचे क्रेडिट कार्ड नियम बदलले

एचडीएफसी बँकेने आपल्या क्रेडिट कार्ड वापरावर काही प्रकारच्या खर्चांवर अतिरिक्त शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे.

• गेमिंग अॅप्स: जर आपण एमपीएल, ड्रीम 11 सारख्या गेमिंग प्लॅटफॉर्मवर महिन्याला ₹10,000 पेक्षा जास्त खर्च करत असाल, तर त्या रकमेवर 1% अतिरिक्त शुल्क आकारले जाईल.

• थर्ड पार्टी वॉलेट्स: मोबिक्विक, पेटीएम, ओला मनी, फ्रीचार्ज इत्यादी वॉलेटमध्ये ₹10,000 पेक्षा जास्त रक्कम भरल्यास देखील 1% चार्ज लागेल.

• फ्युएल ट्रांजेक्शन: जर पेट्रोल, डिझेलवर महिन्याला ₹15,000 पेक्षा जास्त खर्च झाला, तर त्यावर देखील 1% शुल्क भरावे लागेल.

• बिल पेमेंट्स: वीज, पाणी, गॅस बिलांसाठी ₹50,000 पेक्षा जास्त देयके केल्यास, त्यावरही 1% अतिरिक्त शुल्क लागू होणार.

ICICI बँकेचे व्यवहार व शुल्क नियमात बदल

ICICI बँकेने आपल्या IMPS आणि ATM व्यवहारांवरील शुल्कात बदल केला आहे, ज्याचा परिणाम खालीलप्रमाणे होणार:

ATM व्यवहार:

• मेट्रो शहरांमध्ये: दर महिन्याला 3 व्यवहार मोफत, त्यानंतर प्रत्येक व्यवहारासाठी ₹23 शुल्क आकारले जाईल (पूर्वी ₹21 होते).

• लहान शहरांमध्ये: दर महिन्याला 5 मोफत व्यवहार, त्यानंतर ₹23 शुल्क.

• गैर-आर्थिक व्यवहार (बॅलन्स चेक इ.): प्रत्येक व्यवहारासाठी ₹8.50 शुल्क.

IMPS व्यवहार (तत्काळ पैसे पाठवणे):

• ₹1,000 पर्यंत: ₹2.50 प्रति व्यवहार

• ₹1,000 ते ₹1 लाख: ₹5 प्रति व्यवहार

• ₹1 लाख ते ₹5 लाख: ₹15 प्रति व्यवहार

ग्राहकांसाठी महत्त्वाचा इशारा

या दोन्ही बँकांच्या नवीन शुल्क संरचनेचा प्रभाव विशेषतः क्रेडिट कार्ड युजर्स आणि ATM/IMPS व्यवहार करणाऱ्या ग्राहकांवर पडणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी 1 जुलैपासून होणाऱ्या बदलांची माहिती घ्यावी आणि त्यानुसार आपले आर्थिक नियोजन करावे.


About Author

Jitendra bhatavdekar

Other Latest News